Prakash Ambedkar: ‘शरद पवार हे दाऊद इब्राहीमचे दोस्त’, RSS चं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांचा मोठा बॉम्बगोळा, म्हणाले काय?
Prakash Ambedkar on Sharad Pawar : वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा शरद पवार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. पक्ष प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर संविधान सन्मान महासभेत घणाघाती टीका केली. तर अंजली आंबेडकर यांनीही मोठा दावा केला.

Prakash Ambedkar on Sharad Pawar: “शरद पवार हा दाऊद इब्राहिमचा दोस्त आहे. हा मुद्दा ना कम्युनिस्ट उचलतील ना महाविकास आघाडी उचलेल. कारण राजकीय पक्षांच्या नेत्यांना गुलाम केलं आहे. त्यामुळे देशाचे संविधानाच नाही, तर स्वातंत्र्य सुद्धा धोक्यात आले आहे.” अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. बुधवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पक्षाने संविधान सन्मान महासभा घेतली. याच सभेतून राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनीही राष्ट्रवादीचे नाव न घेता मोठी टीका केली.
सत्ताधाऱ्यांना विचारला जाब
यासभेतून प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली. ” इथल्या सनातन्यांना आम्ही विचारतो की, तुम्ही सरकारला विचारणार आहे की नाही नेमकं किती राफेल आहेत ? घेतलेले ३६ आहेत की इंटरनॅशनल एअर फोर्स मॅक्सिननुसार ३२ आहेत ? इथल्या मीडियाला मी विचारतो याबाबत तुम्ही खबर देणार आहेत की नाही ? राजकीय पक्ष विकले गेले आहेत. ज्या बांगलादेश सोडवण्यासाठी १९७१ साठी भारतीय जवानांनी आपले रक्त सांडले आणि बांगलादेश मधील ५० लाख ते दोन कोटी लोकांचे अन्न धान्य पुरवले त्या राष्ट्रासोबत सुद्धा आता यांचे संबंध चांगले नाहीत. शेजारील राष्ट्रासोबत भांडणे आणि जगभर विश्वगुरू म्हणून दवंडी पिटवतात.” अशी टीका केली.
इथल्या सनातन्यांना आम्ही विचारतो की, श्रीलंकेत राम माधव कोणासोबत जाऊन बसला होता. राम माधवची आणि ISI च्या पाकिस्तानच्या इंटेलिजन्सीची भेट झाली की नाही याचा खुलासा करा. हे विचारायची हिंमत राहुल गांधी मध्ये नाही. उद्धव मध्ये तर नाहीच नाही. बाळासाहेब आंबेडकर आप आदेश करो, हम संघर्ष को तयार है! राजकीय स्थैर्य ज्याला आपण म्हणतो ते स्थैर्य आपल्याला भारतीय संविधानाने दिले. भारत हा असा देश आहे जिथे स्वातंत्र्यानंतर रक्तरंजित क्रांती झाली नाही. पण जिथे स्वातंत्र्यानंतर रक्तरंजित झाली ते देश आजही अस्वस्थ आहेत. भारतात असे झाले नाही कारण याचे स्वातंत्र्य आणि याचा आधार तो आधार म्हणजे भारताचे संविधान आहे. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे, असे आंबेडकर म्हणाले.
भाजपची बी टीम म्हणून कोणाकडून खोटा प्रचार?
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी सुद्धा राष्ट्रवादीचे नाव न घेता मोठी टीका केली. आंबेडकरी चळवळ जे मुद्दे मांडते तेव्हा दखल घेतली जात नाही, पण तेच मुद्दे राहुल गांधींनी मांडले तर लगेच त्याचा उदो उदो केला जातो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये विचारवंतांची बैठक असतात. ते कोणाचे आहे तुम्हाला माहिती आहे. तिथे एक ठराव पास केला जातो की, बाळासाहेब आंबेडकर हे भाजपचे बी टीम आहेत. असा खोटा प्रचार करा. त्यानंतर एक टोळधाड सतत बी टीमचा प्रचार करत आहे, अशी टीका केली. पण आपण याकडे दुर्लक्ष करून आपली बांधणी सुरू ठेवली आहे. भारताच्या तमाम नागरिकांच्या मनावर मनुस्मृतीचे जोखड 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेबांच्या विचारांनी फेकून दिले, असे त्या म्हणाल्या.
