Manoj Jarange: 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपप्रकरणात मोठा ट्विस्ट, मनोज जरांगे यांची मोठी हिंट, म्हणाले…
Manoj Jarange SIT at Antarwali Sarati: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब टाकला होता. प्रकरणात एसआयटी पथक अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणा मोठा ट्विस्ट आला आहे.

ज्ञानेश्वर लोंढे,प्रतिनिधी, टीव्ही9 मराठी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी 500 कोटींची कथित ऑडिओ बॉम्ब टाकला होता. 2024 मधील निवडणुकीच्या जवळपासच्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये विविध मुद्दे मॅनेज करण्याचे नियोजन होत असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यात मनोज जरांगे यांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने 500 कोटी रुपये दिल्याचे म्हटले होते. तर खासदार श्रीकांत शिंदे यांचाही या कथित ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख होता. याप्रकरणाच्या चौकशीसाठी एक एसआयटी पथक नेमण्यात आले होते. बुधवारी हे एसआयटी पथक अंतरवाली सराटीत धडकले. त्यावेळी जरांगे पाटील यांनी याप्रकरणावर थेट प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले जरांगे पाटील?
“देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मनावर घेतला असं वाटत आहे त्या क्लिप मध्ये बोलणारे त्यांचे लोक असले तरी सोडायचं नाही. जनतेत त्यांच्याबद्दल जो विश्वास आहे तो कमवायचा असं त्यांनी ठरवले असे वाटते. यांच्यात गुन्हे दाखल केले तर ते या भूमिकेत आहेत असं समजेल. जर त्यांनी त्यांचे लोक वाचवले तर मराठा समाज जाणार आहे की या देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा हात होता. मी SIT ऑडिओ क्लिप दिली आहेत माझ्याकडे जशी आली तशा तशी मी त्यांना दिली आहे यात माझं काही घातपात करण्याचा हेतू होता का त्याच्या पूर्ण खोलात जाऊ त्याची चौकशी करा अशी मागणी केली आहे. त्या पाचशे कोटी प्रकरणात पुढील सुद्धा चौकशी करण्याची मागणी केली.” अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली.
एसआयटीला तो पेन ड्राईव्ह दिला
जे सत्य आहे ते उघडे पाडा, यात बलकवडे साहेब आहेत त्यामुळे हे कुठेतरी कडेला जाईल. SIT मी पेन ड्राईव्ह मागितला आहे आम्ही त्यांना दिला आहे, पुढे सुद्धा त्यांना जबाब लागला तर जबाब देणार आहेत. आमचे सोर्स कोण आहेत हे जर माहिती पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांनी सरकारने त्यांच्या जीविताची जबाबदारी घ्यावी. 500 कोटीचं कळेल लावा हे सुद्धा त्यांना सांगितलं आहे. SIT तपास करेल मात्र सरकारने त्यांना तपास करून दिला पाहिजे, असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.
जरांगे पाटील यांची मोठी हिंट
हे सगळे खोटं आहे हाच निर्णय येईल असे वाटत आहे, पण फडणवीस साहेबांनी हे मनावर घेतले असे वाटते त्यांनी ते कडेला न्यावं. सोर्सच्या जीवाला धोका आहे म्हणून नाव सांगू शकत नाही. रामदास कदम यांना ज्यांनी क्लिप दिली त्याच माणसाने आम्हाला सुद्धा क्लिप दिली अशी दाट शक्यता आहे. रामदास कदम यांना विचारा तुम्हाला क्लिप कोणी दिली, असे सूचक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले.
पंचनाम्यावर जरांगेंची स्वाक्षरी
मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी एसआयटी पथक धडकले. त्यांनी जरांगेंशी चर्चा केली. या क्लिपसंदर्भातील माहिती जरांगे यांनी दिली. त्यानंतर पथकाने जरांगे यांची 5 ठिकाणी स्वाक्षरी घेतली. एसआयटी पथकाने पंचनाम्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली. ज्यानं हा मोबाईल आणला. त्याच्याच मोबाईलमधून ती ऐकवल्याचा दावा जरांगे यांनी केला. तर माझी बदनामी करण्याचा डाव सुरू असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. त्यांनी यावेळी भाजपवर विखारी टीका केली.
