Australia vs India, 1st Test, Day 1 : विराटची झुंजार खेळी, पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाच्या 6 बाद 233 धावा

| Updated on: Dec 17, 2020 | 8:40 PM

हा पहिला कसोटी सामना डे-नाईट असणार आहे.

Australia vs India, 1st Test, Day 1 :  विराटची झुंजार खेळी, पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाच्या 6 बाद 233 धावा
Follow us on

अ‌ॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia vs India, 1st Test) यांच्यात आजपासून (17 डिसेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात झाली. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान टीम इंडियाने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 6 विकेट गमावून 233 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने 74 धावा केल्या. तसेच उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 42 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 2 विकेट्स घेतले. ind tour australia 2020-21 india vs australia 1st test live score updates at Adelaide Oval लाईव्ह स्कोअरकार्ड 

टॉस जिंकून टीम इंडिया फलंदाजीसाठी आली. टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात राहिली. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या पृथ्वी शॉने पुन्हा एकदा निराशा केली. पृथ्वी सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. मिचेल स्टार्कने त्याला बोल्ड केलं. पृथ्वीला भोपळाही फोडता आला नाही.

यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. दोघेही चांगल्यापैकी सेट झाले. मात्र पॅट कमिन्सने ही जोडी फोडली. कमिन्स मयंकला 17 धावांवर बोल्ड केलं. मयंकला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. टीम इंडियाने दुसरा विकेट 32 धावावंर गमवला.

तिसऱ्या विकेटसाठी 68 धावा

मयंकनंतर कर्णधार विराट मैदानात आला. विराट-पुजाराने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी मैदानात घट्ट पाय रोवले. दोघेही सेट झाले. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागादारी झाली. मात्र यानंतर नॅथन लायनने सेट पुजाराला लाबुशानेच्या हाती कॅच आऊट केलं. पुजारा 43 धावांवर बाद झाला. त्याने 160 चेंडूत 2 चौकांरासह 43 धावा केल्या.

पुजारा माघारी गेल्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात आला. विराट आणि रहाणेनेही चांगली भागीदारी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 88 धावा जोडल्या. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि रहाणेच्या चुकीच्या कॉलमुळे विराट 74 धावांवर रन आऊट झाला. यामुळे टीम इंडियाची 188-4 अशी स्थिती झाली. विराट मागोमाग रहाणेही 42 धावावंर बाद झाला. तर त्यानंतर हनुमा विहारीनेही 16 धावांवर आपली विकेट फेकली.

दरम्यान दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऋद्धीमान साहा नाबाद 9 तर रवीचंद्रन आश्विन नाबाद 15 धावांवर खेळत होते.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ : टीम पेन (कर्णधार), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मोझेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशाने, नॅथन लायन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन आणि मॅथ्यू वेड.

संबंधित बातम्या :

IND vs AUS | अनेक खेळाडू ऑऊट ऑफ फॉर्म, तरीही निवड, कोहलीचा निर्णय महागात पडणार?

ind tour australia 2020-21 india vs australia 1st test live score updates at Adelaide Oval