IND vs SL U19 ODI : वॉलचा मुलगा सेम वॉल सारखा खेळला, कठीण प्रसंगात अन्वय द्रविडची श्रीलंकेविरुद्ध तुफान बॅटिंग

IND vs SL U19 ODI : प्रतिभावान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना भारतीय क्रिकेटमध्ये वॉल म्हटलं जातं. आज त्यांचा मुलगा अन्वय द्रविड श्रीलंकेत राहुल द्रविड यांच्या पावलावर पाऊल ठेऊन सेम वॉलसारखा खेळला. राहुल द्रविडच्या मुलाने क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकून घेणारा खेळ दाखवला.

IND vs SL U19 ODI : वॉलचा मुलगा सेम वॉल सारखा खेळला, कठीण प्रसंगात अन्वय द्रविडची श्रीलंकेविरुद्ध तुफान बॅटिंग
Anvay Dravid Rahul Dravid Son
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 06, 2026 | 1:57 PM

भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला टीम इंडियाचं संकटमोचक म्हटलं जातं. वॉल ही राहुल द्रविडची ओळख आहे. टीम इंडिया अडचणीत असेल तेव्हा राहुल द्रविड पाय रोवून खेळपट्टीवर उभा रहायचा, म्हणून द्रविडला वॉल हे नाव पडलं. राहुल द्रविडचं उदहारण आजही भारतीय क्रिकेटमध्ये उदयोन्मुख क्रिकेटपटुंना दिलं जातं. आता राहुल द्रविड यांचा लहान मुलगा अन्वय बाबांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे निघाला आहे. अंडर 19 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अन्वय द्रविडची इनिंग बघून असचं वाटतय. या सामन्यात अन्वय द्रविड अंडर 19 करियरमधील आपली सर्वात मोठी इनिंग खेळला. महत्वाचं म्हणजे कठीण प्रसंगात संघाला गरज असताना तो ही इनिंग खेळला.

हंबनतोता येथे भारत आणि श्रीलंकेच्या अंडर 19 टीममध्ये मॅच सुरु आहे. भारतीय संघाने पहिली फलंदाजी केली. भारताचे चार फलंदाज 100 धावात तंबूत परतले, त्यावेळी टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय चुकला असं वाटत होतं. अशावेळी मिडिल ऑर्डरमध्ये फलंदाजीला आलेल्या अन्वय द्रविडने फक्त वेगवान गतीने धावाच केल्या नाहीत, तर त्याने अर्जुन राजपूत सोबत मिळून पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

द्रविडच्या मुलाची 145 रन्सची पार्टनरशिप

अन्वय द्रविडने अर्जुन राजपूत सोबत मिळून पाचव्या विकेटसाठी 145 धावांची भागीदारी केली. अन्वयच्या इनिंगमुळे टीम इंडिया 4 बाद 81 वरुन 5 बाद 226 पर्यंत पोहोचली. अर्जुन राजपूत 76 धावांवर आऊट झाल्यानंतर या पार्टनरशिपचा शेवट झाला. भारताचा डाव 47.2 ओव्हर्समध्ये 285 धावांवर आटोपला.

अन्वय द्रविडची तुफान बॅटिंग

अर्जुन राजपूत सोबत भागीदारी करताना अन्वय द्रविडने अंडर 19 करिअरमधील पहिलं अर्धशतक झळकावलं. त्याने 47 चेंडूत अंडर 19 करियरमधील पहिली हाफ सेंच्युरी झळकवली. यात 4 चौकार आणि 1 षटकार आहे. अन्वय द्रविडने 67 चेंडूत 87 धावांची खेळी खेळला. यात 9 फोर आणि एक सिक्स आहे. अर्धशतक झळकवण्यासह तो अंडर 19 करियरमधली मोठी इनिंग खेळला. अन्वय द्रविडची इनिंग फिफ्टी झाल्यानंतरही सुरु होती. कठीण काळात अर्धशतक झळकवून अन्वयने त्याच्यातही वडिलांसारखीच क्षमता असल्याचं दाखवून दिलं. पहिल्या मॅचमध्ये त्याने फक्त 14 धावा केल्या होत्या.

 

Follow Us