AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Dravid son Anvay : राहुल द्रविडच्या मुलाची कमाल, 48 सिक्स-फोरसह ठोकल्या 459 धावा

Anvay Dravid : अन्यव द्रविड हा राहुल द्रविड यांचा छोटा मुलगा आहे. KSCA च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात त्याला सन्मानित करण्यात आलं. अन्यवयचा हा सन्मान 459 धावा बनवण्यासाठी करण्यात आला. या धावा त्याने कधी, कुठे आणि कशा केल्या त्या बद्दल जाणून घ्या.

Rahul Dravid son Anvay : राहुल द्रविडच्या मुलाची कमाल, 48 सिक्स-फोरसह ठोकल्या 459 धावा
Rahul Dravid son AnvayImage Credit source: Getty Images/ X
| Updated on: Oct 06, 2025 | 9:08 AM
Share

Anvay Dravid, KSCA Annual Awards : राहुल द्रविड यांचं व्यक्तीमत्व आणि त्यांची प्रतिभा सगळ्यांना माहित आहे. पण आता त्यांचा मुलगा सुद्धा कमी नाहीय. आम्ही द्रविड यांची दोन मुलांपैकी लहान मुलगा अनवयबद्दल बोलत आहोत. 5 ऑक्टोंबरला झालेल्या KSCA वार्षिक पुरस्कार सोहळ्यात त्याला सन्मानित करण्यात आलं. क्रिकेटच्या मैदानावरील दमदार कामगिरीसाठी अनवय द्रविडला हा पुरस्कार मिळाला आहे. त्याने अंडर 16 विजय मर्चेन्ट ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्या. त्यासाठी त्याला वार्षिक पुरस्कार सोहळ्यात KSCA कडून सन्मानित करण्यात आलं. अनवयला त्याच्या कामगिरीसाठी KSCA कडून दुसऱ्यांदा सन्मानित करण्यात आलय.

अनवय द्रविडला KACA ने पुरस्कार देऊन यासाठी सन्मानित केलं कारण त्याने 48 सिक्स-फोरसह 459 धावा केल्या. अन्वयने या धावा कुठल्या एका सामन्यात नाही, तर 91.80 च्या सरासरीने 6 सामन्यात 8 इनिंगमध्ये केल्या. यात दोन सेंच्युरी आहेत. 459 धावांमध्ये त्याने 46 फोर आणि 2 सिक्स मारल्या. अन्वय द्रविड अंडर 16 विजय मर्चेन्ट ट्रॉफीमध्ये कर्नाटककडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. इतकच नाही, टुर्नामेंटमधील सर्वाधिक चांगली सरासरी असणाराही तो फलंदाज आहे.  राहुल द्रविड टीम इंडियाचे माजी हेड कोच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने 2024 साली टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता.

राहुल द्रविडच्या मुलाशिवाय अजून कोणाला सन्मानित केलं?

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सन्मानित होणारा अन्वय द्रविड एकमेव खेळाडू नाहीय. राहुल द्रविडच्या मुलाशिवाय मयंक अग्रवाल आणि आर. स्मरणला सुद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

मयंक अग्रवालला हा अवॉर्ड विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटककडून सर्वाधिक धावा करण्यासाठी मिळाला. 93 च्या सरासरीने त्याने 651 धावा केल्या. युवा खेळाडू आर. स्मरणला रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या प्रदर्शनासाठी सन्मानित करण्यात आलं. डावखुऱ्या स्मरणने रणजीमध्ये 64.50 च्या सरासरीने 516 धावा करताना 2 शतकं ठोकली आहेत.

KSCA अवॉर्ड सोहळ्यात कर्नाटकचा विकेटकिपर फलंदाज केएल श्रीजीतला सुद्धा सन्मानित करण्यात आलं. त्याने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 213 धावा केल्या. त्यासाठी त्याला पुरस्कार मिळाला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.