Video : विराट कोहली याची सामन्यादरम्यान ती कृती कॅमेऱ्यात कैद, नक्की काय करत होता?

| Updated on: Mar 09, 2023 | 6:02 PM

चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने अधिराज्य गाजवलं. उस्मान ख्वाजाने शतकी खेळी करत गोलंदाजांच्या तोंडाला फेस आणला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमवून 255 धावा केल्या.

Video : विराट कोहली याची सामन्यादरम्यान ती कृती कॅमेऱ्यात कैद, नक्की काय करत होता?
हंगर अच्छे अच्छे को बदल देता है! विराट कोहली याचा लाईव्ह सामन्यादरम्यानचा तो व्हीडिओ व्हारयल
Image Credit source: AP
Follow us on

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने अधिराज्य गाजवलं. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमवून 255 धावा केल्या. या डावात ऑस्ट्रेलियाच्या उस्माना ख्वाजानं नाबाद 104 धावांची खेळी केली. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाची दमछाक होईल, असंच चित्र आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी भारताला हा सामना काहीही करून जिंकावाच लागणार आहे. या मालिकेत केएल राहुलनंतर विराट कोहलीची बॅटही हवी तशी तळपळी नाही. असं असताना या सामन्यातील 23 षटकात वेगळंच दृष्य पाहायला मिळालं. विराट कोहली काहीतरी खात असल्याचं कॅमेऱ्यात चित्रित झालं आहे.

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फलंदाजी करत असताना विराट कोहली स्लिपला क्षेत्ररक्षण करत होता. रविंद्र जडेजाच्या जागी रोहित शर्माने मोहम्मद शमीला षटक टाकायला दिलं होतं. ट्रॅव्हिस बाद झाल्यानंतर लाबुशेन मैदानात उतरला होता. तेव्हा स्लिपला उभा असलेला विराट कोहली काहीतरी खाताना दिसला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत विराट कोहली साधं अर्धशतकंही झळकावू शकला नाही. 12, 44, 20, 22 आणि 13 अशी आतापर्यं खेळलेल्या पाच डावातील खेळी आहे. त्याचा फॉर्म पाहून क्रीडाप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुध्दचा चौथा कसोटी सामना जिंकणं गरजेचं आहे. या विजयानंतर भारतीय संघ थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणार आहे. पण हा सामना गमावला किंवा ड्रॉ झाला तर न्यूझीलँड आणि श्रीलंका मालिकेवर अवलंबून राहावं लागणार आहे.

भारताने चौथा सामना गमावला आणि श्रीलंकेनं न्यूझीलँड विरुद्धची मालिक 2-0 ने जिंकली तर श्रीलंकेला थेट अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. पण एक सामना गमावला किंवा ड्रॉ झाला तर मात्र भारताला संधी मिळणार आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.