IND vs AUS | टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

एकदिवसीय मालिकेची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होणार आहे.

IND vs AUS | टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, हा खेळाडू संघाबाहेर
| Edited By: | Updated on: Nov 19, 2020 | 11:09 AM

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Team India Tour Australia) सिडनीमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होणार आहे. मात्र त्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूने टीम इंडियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेतून माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसनने (Kane Richardson) माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. ind vs australia kane richardson out for odi and t 20 series against india

माघार घेण्याचं कारण काय?

केन रिचर्डसनच्या घरी नुकतेच नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. केनच्या पत्नीने नुकतेच बाळाला जन्म दिला आहे. अशा महत्वाच्या क्षणी केनला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे केनने माघार घेतली आहे. “आम्ही आमच्या सर्व खेळाडूंच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या नेहमीच पाठीशी असतो. आम्ही केनच्या निर्णयाचं समर्थन करतो. केनसाठी टी 20 मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय हा फार कठीण होता”, असं ऑस्ट्रेलियाच्या मुख्य निवड समितीचे अधिकारी म्हणाले. केन रिचर्डसनने माघार घेतल्याने गोलंदाज अँड्रयू टायला (Andrew Tye) संधी देण्यात आली आहे.

विराटलाही रजा मंजूर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या घरीही जानेवारी 2021 मध्ये नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार आहे. अशा वेळेस विराट आपल्या कुटुंबासोबत उपस्थित राहणार आहे. त्यामुळे विराट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर भारतात येणार आहे. बीसीसीआयने विराटला पालक्तवाची रजा मंजूर केली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध आधी एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर टी 20 आणि कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.

मालिकानिहाय वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

ind vs australia kane richardson out for odi and t 20 series against india