IND vs NZ 1st Test Day 2 : राहुल-जैस्वालची 1 नंबर बॅटिंग, भारताचा जबरदस्त पलटवार, 10 वर्षात न्यूझीलंडला पहिल्यांदा पहावा लागला असा दिवस
IND vs NZ 1st Test Day 2 : टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमबॅक केलय. भारताचे दोन्ही ओपनर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांच्या बळावर टीम इंडियाने जोरदार पलटवार केला.

IND vs NZ 1st Test, Day 2 : वेलिंगटन कसोटीच्या पहिल्या डावातील न्यूझीलंडच्या 368 धावांचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली आहे. आज पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. आजच्या दिवसाचा खेळ संपताना भारताच्या एक बाद 159 धावा झाल्या आहेत. टीम इंडिया न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून 209 धावा पिछाडीवर आहे. दिवसाचा खेळ संपताना केएल राहुल 52 धावांवर नाबाद आहे. देवदत्त पडिक्कल 16 धावा करुन क्रीजवर आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलने डावाची सुरुवात करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विकेट मिळणार नाही याची काळजी घेतली. दोघांनी ओपनिंग जोडीसाठी 130 धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वालच्या रुपाने भारताने दुसऱ्यादिवशी एकमेव विकेट गमावला. त्याने वनडे स्टाइल बॅटिंग करताना 89 चेंडूत 85 धावा केल्या. यशस्वीने आकर्षक आणि वेगवान बॅटिंग केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विकेटसाठी तरसवलं.
भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक झळकवली. 10 वर्षात पहिल्यांदा न्यूझीलंडच्या भूमीवर परदेशी टीमच्या दोन्ही ओपनर्सनी टेस्ट मॅचच्या एकाच डावात 50 प्लस धावा केल्या आहेत. यापूर्वी नोव्हेंबर 2016 मध्ये हॅमिल्टन टेस्ट मॅचमध्ये पाकिस्तानचे दोन्ही ओपनर समी असलम आणि अजहर अली यांनी 369 धावांचा पाठलाग करताना हा कारनामा केलेला.
सहाव्या विकेटसाठी 216 धावांची भागीदारी
न्यूझीलंडने पहिल्या दिवस अखेर 243 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचे पाच विकेट शिल्लक होते. आज 125 धावांची भर घातल्यानंतर न्यूझीलंडचा डाव 368 धावांवर आटोपला. ग्लेन फिलिप्सचा मुख्य अडथळा आकाश दीपने दूर केला. न्यूझीलंडकडून हेनरी निकोल्स 335 चेंडूत (175) धावा आणि ग्लेन फिलिप्सने 216 चेंडूत (118) धावा केल्या. या दोघांच्या बळावर न्यूझीलंडने 368 धावांचा टप्पा गाठला.
भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला
दोघांनी सहाव्या विकेटसाठी 216 धावांची भागीदारी केली. निकोल्स आणि फिलिप्सला बाद करताना भारताच्या चांगल्याच नाकीनऊ आल्या. दोघांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. कालच्या पहिल्या दिवसाच्या खेळात सुरुवातीच्या सत्रावर भारताने वर्चस्व गाजवलं होतं. 5 बाद 70 अशी न्यूझीलंडची अवस्था होती.