IND vs NZ : न्यूझीलंडच्या कॅप्टनने DRS घेतला नाही म्हणून गोलंदाज मॅट हेनरी चिडला, बाऊंड्री लाइनवर जे वागला त्याची सगळीकडे चर्चा VIDEO
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड मध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सुद्धा या मध्ये हातभार लावला.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये दोन टेस्ट मॅचची सीरीज सुरु आहे. आज वेलिंग्टनच्या बेसिन रिजर्ववर पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस होता. या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथमने घेतलेला एक निर्णय टीमला महाग पडला. भारताचा ओपनर केएल राहुलला बाद ठरवण्यासाठी मॅट हेनरीने जोरदार अपील केलं. पण अंपायरने नॉट आऊट दिलं. लॅथमने यावर रिव्यू घेतला नाही. रिप्लेमध्ये चेंडू स्टम्प्सवर लागत असल्याचं दिसलं. न्यूझीलंडला एक विकेट मिळाला असता. भारताच्या पहिल्या इनिंगच्या सातव्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. मॅट हेनरीचा चौथा चेंडू केएल राहुलच्या पॅडला लागला होता. चेंडू स्टम्प्सच्या लाइनमध्ये असल्याचं रिप्लेमध्ये दिसलं. रिव्यू घेतला असता तर राहुलला बाद ठरला असता. हे पाहून हेनरी प्रचंड चिडला. रागात त्याने आपलं स्वेटर बाऊंड्री लाइनवर फेकलं. हेनरीसह वेगवान गोलंदाज जेमिसन सुद्धा निराश दिसला.
याआधी चौथ्या षटकात काइल जेमिसनच्या अपीलवर न्यूझीलंडने डीआरएस घेतला होता. पण तिसऱ्या अंपायरने निर्णय बदलला नाही. बॉल ट्रॅकिंग सुद्धा झालं नाही. न्यूझीलंडला वाटलं की त्यांचा रिव्यू वाचला. पण मॅच अधिकाऱ्यांनी नंतर सांगितलं की, टीमने हा रिव्यू गमावला आहे. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी ओपनर यशस्वी जैस्वालला सु्द्धा त्रास दिला. हेनरीचा एक चेंडू ऑफ स्टम्पच्या बाजूने गेला. एक चेंडू शॉट मिड-ऑनच्या वरुन गेला. काइल जेमिसनच्या चेंडूवर अनेकदा चेंडूने बॅटची कड घेतली. पण स्लीप आणि गली मध्ये उभ्या असलेल्या फिल्डरला कॅच पकडता आली नाही. ग्लेन फिलिप्सने सुद्धा एक कॅच सोडली.
पण त्यांना विकेट मिळाला नाही
न्यूझीलंडने चांगली गोलंदाजी केली. पण त्यांना विकेट मिळाला नाही. त्यांना विकटेसाठी संघर्ष करावा लागला. भारताचे ओपनर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. यशस्वीने 85 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडने टॉस हरला. पहिली बॅटिंग करताना त्यांनी 368 धावा केल्या. न्यूझीलंडने हेनरी निकोल्सच्या नाबाद 175 धावा आणि ग्लेन फिलिप्सच्या 118 धावांच्या बळावर 368 चा टप्पा गाठला.