IND vs NZ : प्रजासत्ताक दिनी टीम इंडियाकडून चाहत्यांना विजयाचं गिफ्ट, मालिकेत आघाडी

सलामीवीर लोकेश राहुलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:42 PM, 26 Jan 2020
IND vs NZ : प्रजासत्ताक दिनी टीम इंडियाकडून चाहत्यांना विजयाचं गिफ्ट, मालिकेत आघाडी

IND vs NZ  वेलिंग्टन (न्यूझीलंड) : सलामीवीर लोकेश राहुलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत टीम इंडियाला 133 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 7 गडी राखत पूर्ण केलं. त्याशिवाय  भारत विरुद्ध न्यूझीलंड या टी-20 मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. देशभरात आज 71 वा प्रजासत्ताक दिवस साजरा होत (IND vs NZ LIVE) आहे. संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण असताना टीम इंडियाने चाहत्यांना विजयाचं गिफ्ट दिलं आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंड पाच विकेटस् गमावत 132 धावांची खेळी केली. न्यूझीलंडने भारताला दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. भारताकडून सलामीसाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा अवघ्या 8 धावा करत माघारी परतला. त्यानंतर लोकेश राहुलने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. लोकेश राहुलने 50 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावा केल्या.

लोकेश राहुलसोबत कर्णधार विराट कोहली चांगली फटकेबाजी करत असताना झेलबाद झाला. अखेरपर्यंत मैदानात तग धरुन ठेवलेल्या लोकेश राहुलला श्रेयस अय्यरची चांगली साथ मिळली. श्रेयसने 33 चेंडूत 44 धावा केल्या. शेवटच्या दोन ओवर शिल्लक असताना श्रेयस अय्यर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या शिवम दूबेने नाबाद 8 धावा केल्या.

भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर मार्टिन गप्टिल याने आक्रमक सुरुवात केली.  20 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीन 33 धावा केल्या. मात्र उंच फटका मारण्याच्या नादात शार्दूलच्या चेंडूवर विराटने त्याचा झेल टीपला.

त्यानंतर कोलिन मुनरोने 25 चेंडूत 26 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार केन विल्यम्स देखील स्वस्तात तंबूत परतला. त्याने 20 चेंडूत 14 धावा केल्या. त्यापाठोपाठ कोलिन डी ग्रँडहोमही अवघ्या 3 धावांवर बाद झाला. रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी काहीसा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर रॉस टेलर झेलबाद झाला. टेलरने 24 चेंडूत 18 धावा केल्या.

न्यूझीलंड पाच विकेटस् गमावत 132 धावांची खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने 2, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना ऑकलंडच्या इडन पार्क मैदानावर खेळवण्यात आला. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.20 वाजता हा सामना सुरुवात झाली. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-20 सामनादेखील याच मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करुन पाच संघाच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली होती.

भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने भारताला 203 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र, या आव्हानाला भारतीय संघाने सहज पूर्ण केलं. या सामन्यात केएल राहुल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे भारताचा 6 गडी राखत विजय झाला (IND vs NZ LIVE)  होता.

गोलंदाजांपुढे आव्हान

ईडन पार्क मैदान लहान आहे. त्यामुळे आजही या मैदानावर फलंदाजांचं वर्चस्व बघायला मिळेल. मैदान लहान असल्यामुळे फलंदाजांना रोखण्याचं आव्हान दोन्ही संघाच्या गोलंदाजांपुढे असणार आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, मनिष पांडे, रविंद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, कुलदीप यादव, नवदीप सैनी, वृषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर

न्यूझीलंडचा संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कगलेजिन, कोलिन मुनरो, कोलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डार्ली मिशेल, मिशेल सँटनर, टीम सेफर्ट (विकेटकीपर), हामीश बेनेट, ईश सोढी, टीम साऊदी, ब्लेयर टिकनेर