IND vs NZ: मला कर्णधाराशी लेणदेणं नाही, माझ्यासाठी फक्त…गौतम गंभीरच्या विधानाने खळबळ, श्रेयसबद्दल काय म्हणाले?
Gautam Gambhir : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आता श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावर अनेक मोठ मोठी विधान केली आहे,

Gautam Gambhir On Team India: भारत न्यूझीलंड टी-२० पार पडली, जी भारतीय संघाने ३-२ ने जिंकली. सुरुवातीचे सामन्यात जरी भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. तरीही शेवटच्या दोन सामन्यात भारतीय संघाची कामगिरी ही लाजिरवाणी होती. आता शेवटचा पाचवा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने कर्णधार आणि खेळाडूंवर विधान केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने नवीन टी-२० कर्णधार श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाची खूप प्रशंसा केली आहे. अय्यरच्या कर्णधारपदाच्या कामगिरीबद्दल उपस्थित होत असलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर, गंभीरने स्पष्ट केले की “कोणत्याही कर्णधाराचे मूल्यांकन केवळ जय-पराजयच्या आकडेवारीपुरते मर्यादित ठेवता येणार नाही. श्रेयसचे नेतृत्व कौशल्य उत्कृष्ट आहे. युवा खेळाडूंशी जुळवून घेण्याची त्याच्यात क्षमता आहे. कर्णधार पदाबद्दल मला काहीच वाटत नाही, माझं त्याच्याशी काही लेणदेणं नाही, माझं लक्ष हे खेळाडूंच्या कामगिरींवर आहे.”
आकडेवारीनुसार, श्रेयस अय्यरची कर्णधारपदाची कामगिरी कागदावर प्रभावी दिसत नाही. त्याने आतापर्यंत २६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून, त्यात १४ विजय आणि १० पराभव आहेत. ५२ सामन्यांमध्ये ४० विजय आणि केवळ ८ पराभव नोंदवणाऱ्या माजी कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याशी तुलना केल्यास, हा फरक स्पष्ट दिसतो. गंभीर यांच्या मते, या आकडेवारीच्या पलीकडे जाऊन अय्यरने ज्या परिस्थितीत कर्णधारपद भूषवले आहे, त्याकडे पाहणे महत्त्वाचे आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यानंतर गौतम गंभीरने अय्यरच्या कर्णधारपदाचा बचाव करत म्हटले, “गोलंदाजीमध्ये अनुभवाची इतकी कमतरता असूनही, श्रेयसने उत्कृष्ट काम केले आहे. एक कर्णधार म्हणून, तुमचे गोलंदाज आणि फलंदाज जशी कामगिरी करतात, त्यावरच तुमची गुणवत्ता अवलंबून असते. विशेषतः अनुभवी नसलेले गोलंदाज असताना, मला वाटते की त्याने एक अपवादात्मक कामगिरी केली आहे.”
“टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर, आगामी विश्वचषकावर लक्ष ठेवून भारतीय संघात मोठे बदल होत असतानाच अय्यरची संघाच्या नेतृत्वात नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलाचा एक भाग म्हणून, नवीन आणि तरुण खेळाडूंना त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी सातत्याने संधी दिल्या जात आहेत. कठीण परदेशी दौऱ्यांवर नवीन परिस्थिती आणि तरुण गोलंदाजांशी जुळवून घेणे कोणत्याही कर्णधारासाठी सोपे नसते,” परंतु गंभीरच्या मते, अय्यरने ही जबाबदारी कौतुकास्पदपणे हाताळली आहे.
अलीकडील न्यूझीलंड दौऱ्यातही हे आव्हान स्पष्टपणे दिसून आले. संघ व्यवस्थापनाने अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना विश्रांती देऊन युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांच्यावर विश्वास ठेवला. पुढील विश्वचषकासाठी एक मजबूत संघ तयार करण्यासाठी असे कठीण निर्णय आणि प्रयोग आवश्यक आहेत, हे गंभीरने मान्य केले. तो म्हणाला, “जर तुम्ही पुढील विश्वचषकासाठी संघ तयार करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यावी लागेल आणि दौऱ्यादरम्यानच त्यांना विकसित करण्याचा प्रयत्न करावा लागेल.”