AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून तुकाराम मुंढे यांना मोठा झटका, थेट एफडीएच्या..

तुकाराम मुंढे यांच्याकडून मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. मात्र, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तुकाराम मुंढे यांना मोठा दणका दिला आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाचे जोरदार काैतुक सर्वत्र होत आहे. त्यातच आता मोठी बातमी पुढे येतंय.

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून तुकाराम मुंढे यांना मोठा झटका, थेट एफडीएच्या..
Narhari Zirwal and Tukaram Mundhe
| Updated on: Nov 02, 2026 | 8:55 AM
Share

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे राज्यभरात कारवाई करत आहेत. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून कारवाईचा मोठा दणका सुरू आहे. सर्वसामान्य लोक तुकाराम मुंढे यांचे काैतुक करत आहेत. पण काही लोकांकरिता तुकाराम मुंढे अडचण बनले आहेत. कोणाही असो किंवा कोणाचीही कंपनी असो तक्रार आली की, तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाई केली जाते. तुकाराम मुंढे यांनी एफडीएमधून बदली होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. राजस्थानला मुंढेंची बदली होणार असल्याचे मेसेज व्हायरल झाली. तुकाराम मुंढे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, माझी राज्याबाहेर बदली होऊ शकत नाही. तुकाराम मुंढे यांच्यामुळे गुळातील रंग उडावा. जिलेबीचाही खरा रंग दिसत असून तशी विक्री केली जात आहे. अनेक खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ त्यांनी रोखली आहे.

त्यातच आता तुकाराम मुंढे यांनी केलेली मोठी कारवाई पाण्यात गेल्याचे दिसत आहे. पुण्यातील रांजणगाव परिसरातील मिथेनॉल कंपनीवर तुकाराम मुंढे यांच्या विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईला स्थगिती देण्यात आली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी एफडीएने केलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे.

पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर रांजणगावच्या मिथेनॉल कंपनीवर तुकाराम मुंडे यांनी मोठी कारवाई केली. पुण्यातील विषारी दारू प्रकरणात काही लोकांचा जीव गेला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, त्याच कारवाईला मंत्री झिरवाळ यांनी स्थगिती दिली. हेच नाही तर या स्थगितीमागे मोठे कारण असल्याचे सांगितले जातंय

ही संबंधित कंपनी थेट एका राष्ट्रवादीच्या नेत्याशी संबंधित असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या कारवाईला स्थगिती दिली. तुकाराम मुंढे यांनी कंपनीवर कारवाई केली पण झिरवाळ यांनी कंपनीवरील कारवाईला स्थगिती दिली. झिरवाळ यांच्यावर दबाव याकरिता असल्याचे सांगितले जातंय. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून 557 टक्के तक्रारीत वाढ झाली.

Follow Us
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनग
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनगाचे छोटे टोक! आणखी...
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती,
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती, फडणवीसांच्या उपस्थितीत...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी होईल हे त्यांना...
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा