AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonali Bendre: कॅन्सरमुळे टक्कल, रुग्णालयातून बाहेर पडताना सोनालीवर ओढावलेली भयानक परिस्थिती, अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने गंभीर आजारावर मात केली आहे. पण परदेशात उपचार घेतल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडताना अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्यावर मोठी भयानक परिस्थिती ओढावलेली... यावर स्वतः सोनालीने अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा केला आहे.

Sonali Bendre: कॅन्सरमुळे टक्कल, रुग्णालयातून बाहेर पडताना सोनालीवर ओढावलेली भयानक परिस्थिती, अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा
अभिनेत्री सोनाली बेंद्रे
| Updated on: Nov 02, 2026 | 8:40 AM
Share

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मात केली आणि अभिनेत्री आज आनंदी आयुष्य जगत आहे. पण परदेशात कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी सोनाली आणि पती गोल्डी यांच्यावर भायनक परिस्थिती ओढावलेली होती. कॅन्सरच्या उपचारांमुळे सोनालीचं टक्कल झालेले. शिवाय ती व्हिलचेअर होती आणि अभिनेत्री त्या अवस्थेत कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींची मोठी गर्दी जमलेली… तेव्हा रुग्णालयात काय झालेलं… यावर सोनाली हिने मोठा खुलासा केले आहे.

एका मुलाखतीत सोनाली हिला विचारण्यात आलं, तुझा केस नसलेला फोटो आणि मला ठाऊक आहे की, तो माझ्या एकटीसाठी नाही तर असंख्या माणसांसाठी डोळे उघडणारा ठरला असेल…  यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मला गोल्डी म्हणालेला की, त्याच्यावर प्रचंड चर्चा झालेली, सर्वत्र फक्त माझीच चर्चा होती. लोकांचे आम्हाला बाहेरुन फोन यायला लागले होते की, रुग्णालयाच्या बाहेर मीडिया उभी आहे…. लोकं त्याला रुग्णालयाबाहेरची परिस्थिती सांगत होते, त्यामुळे त्याने मला विचारलं, आपण आता काय केलं पाहिजे, थोडा वेळ वाट पाहायची का? की बाहेर पडण्यासाठी वेगळा कोणता मार्ग पाहायचा?’

पुढे सोनाली म्हणाली, ‘आणि मला आठवत आहे, मी सुद्धा विग घालण्याचा प्रयत्न करत होती आणि व्हिलचेअरमध्ये होती. त्यामुळे बाकीचं सगळं सामान येईलपर्यंत आम्ही फक्त विचार करत होतो की काय केलं पाहिजे. तेव्हा मला मीडियाला पाहायचं नव्हतं, पण तो फोटो समोर येणारच होता, त्यामुळे जे आहे ते मी स्वीकारलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जेवढं तुम्ही लपवता, तेवढं ती लोकं मागे धावतात, ते क्लिक करण्यासाठी. म्हणून मी सुद्धा ज्या परिस्थितीत होते, तशी समोर आले.’

‘त्यापुढे चर्चा होणारच होत्या, हे मला माहिती होतं, ‘हे काय आहे, केस नाही… तर काय केस नाहीत तर. नाही आहेत…’ यामध्ये आता गॅसिप करण्यासारखं काय? जे आहे ते मी स्वीकारलं होतं…’ असं थेट सोनाली बेंद्रे म्हणालेली… कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर सोनाली हिने नव्याने आयुष्याची सुरुवात केली आहे. अभिनेत्री आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Follow Us
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनग
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनगाचे छोटे टोक! आणखी...
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती,
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती, फडणवीसांच्या उपस्थितीत...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी होईल हे त्यांना...
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा