IND vs PAK सामन्याचा थरार, भारतीय कॅप्टननं हँडशेक केले की नाही? टॉसवेळी काय घडलं?

IND vs PAK Match Handshake Controversey: भारत आणि पाकिस्तान सामना सध्या सुरु आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलन केले की नाही ते पाहा...

IND vs PAK सामन्याचा थरार, भारतीय कॅप्टननं हँडशेक केले की नाही? टॉसवेळी काय घडलं?
| Updated on: Nov 08, 2026 | 12:03 PM

IND vs PAK Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एसीसी पुरुष १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ चा अंतिम सामना ओमानमधील अल अमेरत क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. भारतीय १९ वर्षांखालील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चेंडू पाकिस्तान १९ वर्षांखालील संघाकडे सोपवला. नाणेफेकीदरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफ यांनी हस्तांदोलन केले के नाही असा प्रश्न आता चाहत्यांनी पडला आहे.

यामुळे भारतीय आणि पाकिस्तानी कनिष्ठ व वरिष्ठ क्रिकेट संघांमधील हस्तांदोलन न करण्याचे धोरण कायम राहिले. खेळाडूंनी हस्तांदोलन न करण्याची ही प्रथा गेल्या वर्षापासून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांमध्ये पाळली जात आहे. गेल्या वर्षीच्या २०२५ च्या आशिया कपपासून, भारत आणि पाकिस्तान नाणेफेकीच्या वेळी आणि सामन्यानंतर होणारे पारंपरिक हस्तांदोलन टाळत आहेत.

Loading...

भारतीय कर्णधार काय म्हणाला?

भारतीय १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानी, नाणेफेक जिंकल्यानंतर म्हणाला, “आम्ही प्रथम फलंदाजी करू. पहिल्या सामन्यातील प्रभावी विजयानंतर, आम्ही तोच वेग कायम ठेवू इच्छितो. आम्हाला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे आणि येथील परिस्थितीही चांगली आहे. खेळपट्टी चांगली दिसत आहे आणि आम्हाला त्यांच्या (पाकिस्तानच्या) विरोधात एक चांगली धावसंख्या उभारून त्यांना दबावाखाली आणायचे आहे.”

पाकिस्तान १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार फरहान युसूफ म्हणाला, “या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करायची की फलंदाजी करायची हे ठरवणे कठीण होते. त्यामुळे, नाणेफेक हरणे ही एक चांगली गोष्ट होती. मागच्या सामन्यात सर्व खेळाडू खूप चांगले खेळले. त्यामुळे, या सामन्यातही आम्ही सुरुवातीपासूनच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू. मला वाटते की खेळपट्टीवर थोडा ओलावा आहे, त्यामुळे आम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करू.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us