IND vs PAK WC 2023 व्हॉट अ कॅच! पाकिस्तानच्या फिल्डरने घेतला हा झकास कॅच

| Updated on: Feb 12, 2023 | 11:33 PM

पाकिस्तानच्या खेळाडूने बाउंड्री लाईनवर घेतलेल्या कॅचची सगळीकडे चर्चा आहे. शफाली वर्माने मारलेला चेंडू अतिशय चपळपणे आणि प्रसंगावधान राखत खेळाडूने कॅच घेतला.

IND vs PAK WC 2023 व्हॉट अ कॅच! पाकिस्तानच्या फिल्डरने घेतला हा झकास कॅच
Follow us on

केपटाऊन : टी-20 वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. पाकिस्तान संघाने दिलेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 7 विकेट्स राखून पहिला सामना खिशात घातला. या सामन्यामधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या खेळाडूने बाउंड्री लाईनवर घेतलेल्या कॅचची सगळीकडे चर्चा आहे. शफाली वर्माने मारलेला चेंडू अतिशय चपळपणे आणि प्रसंगावधान राखत खेळाडूने कॅच घेतला.

पाकिस्तान संघाने भारताला दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने सावध सुरूवात केली होती. सलामीवीर आणि लेडी सेहवाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शफामी वर्माने आपला दांडपट्टा चालू केला होता. संधू संघाचं 10 वं षटक टाकत होती, पहिल्याच चेंडूवर शेफालीने हा चेंडू लाँग ऑफच्या दिशेने खेळला. सिक्सच जाणार असं सर्वांना वाटलं होतं, मात्र सिद्रा अमीनने एकदम टायमिंगला बॉल पकडला आणि शफालीला बाद केलं. शफालीने 25 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या होत्या.

 

पाकिस्तान टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बिस्माह मारूफ हिने सर्वाधिक 68 धावांची नाबाद खेळी केली. बिस्माहने या खेळीमध्ये 7 फोर मारले. त्याशिवाय आयेशा नसीमने 25 बॉलमध्ये नाबाद 43 रन्सची खेळी केली. टीम इंडियाकडून राधा यादवने 2 विकेट्स घेतल्या. तर पूजा वस्त्राकर आणि दीप्ती घोष या दोघींनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

यास्तिका भाटिया आणि शफाली वर्मानं भारताला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 38 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यास्तिका सादिया इक्बालच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 4 चौकारांच्या जोरावर 17 चेंडूत 17 धावा केल्या. त्यानंतर शेफाली वर्मानं आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला.तिनचे 4 चौकाराच्या जोरावर 25 चेंडूत 33 केल्या. मात्र एका चुकीच्या फटक्यामुळे नाश्रा सांधूच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत कौर संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण 12 चेंडूत 16 धावा करून बाद झाली. त्यानंतर जेमिमा आणि रिचा घोषनं संघाला विजयाकडे नेलं. जेमिमानं 38 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या. तर रिचानं 20 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देयोल, रिचा घोष (विकेटकीपर),दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, आणि रेणुका ठाकूर सिंह.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन – बिस्माह मारूफ (कप्तान), जावेरिया खान, मुनीब अली (विकेटकीपर), निदा दार, सिदरा अमीन, आलिया रियाज, आयसा नसीम, फातिमा सना, ऐमान अनवर, नाश्रा संधू आणि सादिया इकबाल.