Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज

IND vs SL 2nd Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यातील दुसरा सामना सध्या सुरु आहे. आता या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात मैदानात राडा झाला. या राड्यावर यशस्वी जयस्वालने उर्मटपणे उत्तर दिले आहे.

Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
| Updated on: Aug 24, 2026 | 12:09 PM

Yashasvi Jaiswal IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना कोलंबो येथील सिंहलीज क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. यशस्वीला बाद केल्यानंतर फर्नांडो आक्रमकपणे जल्लोष करताना दिसला. त्याने काही अशा टिप्पण्याही केल्या ज्या भारतीय फलंदाजाला आवडल्या नाहीत. पॅव्हेलियनकडे परत जात असताना यशस्वी जयस्वाल परत आला आणि असिथा फर्नांडोसोबत वाद घालू लागला. यशस्वीने श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजाच्या डोक्याला धक्का देण्याचाही प्रयत्न केला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून यजमान संघाचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने हस्तक्षेप केला. यशस्वीच्या वर्तनामुळे त्याला आयसीसीकडून बॅनही बसू शकतो पण यशस्वीचा माज काही कमी नाही. आता या प्रकरणावर त्याने उद्धटपणे प्रतिक्रिया दिली आहे.

क्रिकबझने क्रिकेट तज्ञ आणि ज्येष्ठ समालोचक हर्षा भोगले यांचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला. त्यात हर्षा म्हणाले की, “चेंडू निश्चितच चिथावणीखोर होता, पण यशस्वीने त्याच्या इतके जवळ जायला नको होते. यशस्वीने मागील सामन्यात श्रीलंकेच्या निरोशन डिकवेलालाही स्लेजिंग केले होते. अशा परिस्थितीत शांतपणे निघून जावे,” असा सल्ला हर्षा भोगले यांनी दिला आहे.

हर्षा भोगले यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना यशस्वीने लिहिले, “जर तुम्हाला माहितच नाही तो मैदानात काय बोलला, तर कृपया त्यावर आपले मत देऊ नका. जर कोणी मर्यादा ओलांडली, तर आपण त्यांना सांगितले पाहिजे की भारत लढेल आणि प्रत्युत्तर देईल.”

यशस्वी जयस्वालला मैदानावर अशा परिस्थितीचा सामना करण्याची ही पहिली वेळ नाही. २०२२ च्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यादरम्यान, त्याचा एका विरोधी फलंदाजाशी जोरदार वाद झाला होता. पंच आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी समजावण्याचा प्रयत्न करूनही, त्याने ऐकण्यास नकार दिला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेंनी त्याला मैदानाबाहेर पाठवले. सामनाधिकाऱ्याने यशस्वीवर चार सामन्यांची बंदी घालणारे पत्रही तयार केले होते. मात्र, रहाणेच्या त्या निर्णयाने त्याचे करिअर वाचले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us