AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. यावर बोलताना आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे. ठाकरे अन्यायग्रस्त नेते वाटतात, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण..., असीम सरोदेंचं विधान चर्चेत
Asim Sarode Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 12:06 PM
Share

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या काही सुनावणींमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आहे. दरम्यान अद्याप शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी आहे. यावर बोलताना आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘शिवसेना प्रकरणाची सुनावणी वेगात सुरू आहे, निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केली आहे. कायदेशीर सत्य हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना, त्यांना असत्यच आहे,’ अशी वागणूक देण्यात आली. असं ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले सरोदे?

उद्धव ठाकरे यांची बाजू जणू काय असत्यच आहे, अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांना वागणूक देण्यात आली आहे. त्यामुळे मला ते अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात. उद्धव ठाकरे यांच्यावर केवळ राजकीय पक्षातील नेत्यांच्या झुंडीनेच अन्याय केलेला नाही, तर राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी देखील त्यांच्यावर अन्याय केला आहे. सुप्रीम कोर्टात देखील या प्रकरणाला प्रचंड विलंब झाला आहे, या अर्थाने हा सद्धा अन्यायच आहे. त्यामुळेच मला उद्धव ठाकरे हे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण त्यांची बाजू बरोबर असून सुद्धा त्यांना इतक्या वर्ष कोणताही न्याय मिळालेला नाहीये, असं असीम सरोदे यांनी म्हटलं  आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली होती. शिवसेना पक्षाचे दोन गट पडले. एक शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट दरम्यान त्यामुळे शिवसेना पक्षाचं चिन्ह कोणाला द्यायचं असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर होता. विधीमंडळ पक्षाचं बळ पहातात निवडणूक आयोगाने शिवेसना पक्षाचं चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बाजू मांडत आहेत.

Follow Us
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
मोठी बातमी! पंजाब, UP सह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या...
मोठी बातमी! पंजाब, उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे नवे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या तयारीत
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान