IND vs SL : बीसीसीआयच्या जुगाडाची हद्द, मैदान वाळवण्यासाठी इस्त्री, ड्रायरचा वापर

| Updated on: Jan 06, 2020 | 4:12 PM

खेळपट्टीचा ओलसरपणा दूर करण्यासाठी मैदानातील कर्मचाऱ्यांनी इस्त्री, हेअर ड्रायर, व्हॅक्यूम क्लिनरसारख्या वस्तूंचा वापर केला.

IND vs SL : बीसीसीआयच्या जुगाडाची हद्द, मैदान वाळवण्यासाठी इस्त्री, ड्रायरचा वापर
Follow us on

गुवाहाटी : भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी टी 20 मालिकेतील पहिला सामना गुहावटी येथील बारसपरा मैदानात खेळला जाणार होता. मात्र, हा सामना सुरु होण्यापूर्वीच पाऊस पडला. हा पाऊस फार काळ नाही राहिला. मात्र, तरीही खेळपट्टीवरील काही भाग ओलसर राहिला होता. खेळपट्टीचा ओलसरपणा दूर करण्यासाठी मैदानातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. विशेष म्हणजे यासाठी इस्त्री, हेअर ड्रायर, व्हॅक्यूम क्लिनरसारख्या वस्तूंचा वापर केला गेला.

ओल्या खेळपट्टीला सुखवण्यासाठी केले गेलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे अखेर सामना रद्द करावा लागला. दरम्यान, खेळपट्टी सुकवण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नावरुन नेटीझन्सनी बीसीसीआयला प्रचंड ट्रोल केले.

दरम्यान, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला टी 20 सामना रद्द झाल्यानंतर आता दुसरा सामना 7 जानेवारी रोजी होणार आहे. हा सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर 10 जानेवारी रोजी तिसरा टी 20 सामना खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहेत. भारताला टी 20 मालिका जिंकण्यासाठी दोन्ही सामने जिकंणे गरजेचे आहे.