क्रेडिट खुद चलके आ जाता है…भारताला पराभवाचा धक्का दिला अन् विंडीजचा कर्णधार म्हणाला, ते धोनीमुळे…
Shai Hope On MS Dhoni: वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने आता महेंद्र सिंग धोनीमुळे कसं वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी फायदा झाला हे बोलून दाखवले आहे.

IND vs WI 3rd ODI: कर्णधार शाई होपच्या नाबाद १६२ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३५२ धावांचे लक्ष्य ५ गडी राखून पूर्ण केले. तिसरा सामना हरला असला तरी, भारताने मालिका २-१ ने जिंकली. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाने ४८.२ षटकांत सामना पूर्ण केला. कर्णधार शाई होपने १४३ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि १७ चौकारांसह नाबाद १६२ धावा केल्या, तर अमीर जांगूने ६७ धावा केल्या. कीमो पॉलनेही संघासाठी ४४ धावांचे योगदान दिले. सामन्यातील विजयानंतर कर्णधार शाई होपने एक विधान केले आता त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
सामन्यानंतर, कर्णधार शाईने एक विशेष खुलासा केला आणि धोनीच्या एका सल्ल्यामुळे त्याला सामना जिंकण्यास कशी मदत झाली हे स्पष्ट केले. होप म्हणाला की, धोनी नेहमी एक सल्ला देतो तो म्हणजे तुमच्याकडे तितकाच वेळ असतो जेवढा तुम्ही गृहीत धरलेला असतो, तर धोनीच्या याच सल्ल्यामुळे मला संयम राखण्यास आणि सामना जिंकण्यासाठी कोणती रणनीती वापरावी लागेल. यामुळे मला नाबाद १६२ धावा करण्यास मदत झाली.” शाई होपच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात, होपने १४३ चेंडूंमध्ये नाबाद १६२ धावा केल्या, ज्यामुळे वेस्ट इंडिजने भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला.
शाई होप एकदिवसीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक धावांचा पाठलाग करणारा फलंदाज बनला आहे, त्याने २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्ध ख्रिस गेलच्या १६२ धावांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना ही सर्वोच्च धावसंख्या आहे. वेस्ट इंडिजच्या कर्णधाराने श्रीलंकेचा माजी खेळाडू तिलकरत्ने दिलशानचा विक्रम मोडला आहे, ज्याने २००९ मध्ये राजकोट येथे १६० धावांची खेळी केली होती. भारतीय संघाकडून डेथ ओव्हर्समध्ये अतिशय घाणेरडी बॉलिंग केली गेली. अंशुल कंबोजला वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी धु धु धुतले ज्यामुळे विडिंजने सहज सामना जिंकला.