IND vs WI : फक्त रोहितला जमलं, जे विराट, सूर्यकुमार करु शकले नाहीत, ते श्रेयस अय्यरकडे करण्याची संधी, WI विरुद्ध सीरीज मोठी संधी

IND vs WI : आजपासून वेस्ट इंडिज विरुद्ध टी20 सीरीज सुरु होत आहे. श्रेयस अय्यरला कॅप्टन म्हणून एक मोठी संधी आहे. जे विराट कोहली, सूर्यकुमार यादवला जमलं नाही, ते श्रेयस अय्यरला करुन दाखवायची संधी आहे.

IND vs WI : फक्त रोहितला जमलं, जे विराट, सूर्यकुमार करु शकले नाहीत, ते श्रेयस अय्यरकडे करण्याची संधी, WI विरुद्ध सीरीज मोठी संधी
Shreyas iyer
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 06, 2026 | 11:52 AM

वेस्ट इंडिज विरुद्ध टी20 सीरीज ही टीम इंडियाचा कॅप्टन श्रेयस अय्यरसाठी मोठी संधी आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव आपल्या कर्णधारपदाच्या काळात जे करु शकले नाहीत, ते करण्याची संधी श्रेयस अय्यरकडे आहे. श्रेयस अय्यरकडे या दोघांच्या तुलनेत पुढे जाण्याची संधी आहे. तुम्ही विचार करत असाल ही पुढे जाण्याची संधी कुठली? टी20 टीमचा कॅप्टन म्हणून श्रेयस अय्यर काय मिळवू शकतो? श्रेयस अय्यरकडे वेस्ट इंडिज विरुद्ध पाच मॅचच्या टी20 सीरीजमध्ये रोहित शर्माशी बरोबरी करण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नावावर कॅप्टन म्हणून सर्वाधिक T20 सामने जिंकण्याचा रेकॉर्ड आहे.

2024 साली रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 11 टी20 सामने जिंकले. त्याआधीच 2019 आणि 2022 चा रेकॉर्डही जबरदस्त आहे. त्यावेळी रोहितने आपल्या नेतृत्वाखाली भारताला सलग 14 टी20 सामने जिंकून दिले होते. रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला सलग 10 पेक्षा जास्त सामने जिंकून देण्याचा रेकॉर्ड एकदा नाही तर दोनदा केलाय. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार आहे.

Loading...

इतरांना मागे सोडण्याची संधी

विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी सलग 9-9 सामने आपल्या नेतृत्वाखाली जिंकवून दिलेत. विराट कोहलीने 2019-20 मध्ये ही कमाल केली होती. सूर्यकुमार यादवने मागच्यावर्षी हे यश मिळवलं. श्रेयस सध्या विराट आणि सूर्याच्या बरोबरीत उभा आहे. श्रेयसने त्याच्या नेतृत्वाखाली टी 20 मध्ये भारताला सलग 9 सामने जिंकवून दिलेत. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याच्याकडे इतरांना मागे सोडण्याची संधी आहे.

अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा कॅप्टन बनू शकतो

वेस्ट इंडिज विरुद्ध टी20 सीरीजमध्ये श्रेयस अय्यरने क्लीनस्वीप केलं तर तो सुद्धा रोहित शर्माप्रमाणे सलग 14 टी20 सामने जिंकवून देणारा कॅप्टन बनेल. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा कॅप्टन बनू शकतो. म्हणजे जे काम विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव करु शकले नाहीत, ते रोहित शर्माप्रमाणे आपल्या कारकि‍र्दीत करुन दाखवण्याची श्रेयस अय्यरकडे संधी आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us