टी-20 : तिसऱ्या सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर मात

सिडनी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सहा विकेटने सामना जिंकला आहे. भारताने तिसरा सामना जिंकत टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. याआधी दुसरा टी-20 सामना पावसाने रद्द झाला होता. पहिल्या टी-20 सामन्याप्रमाणेच तिसरा टी-20 सामना अटीतटीत झाला. शेवटच्या षटकात कर्णधार विराट कोहलीने दोन चौकार मारत, भारताचा विजय निश्चीत केला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून […]

टी-20 : तिसऱ्या सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर मात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

सिडनी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सहा विकेटने सामना जिंकला आहे. भारताने तिसरा सामना जिंकत टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. याआधी दुसरा टी-20 सामना पावसाने रद्द झाला होता. पहिल्या टी-20 सामन्याप्रमाणेच तिसरा टी-20 सामना अटीतटीत झाला. शेवटच्या षटकात कर्णधार विराट कोहलीने दोन चौकार मारत, भारताचा विजय निश्चीत केला.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 165 धावांचे लक्ष्य दिलं होतं. त्याबदल्यात भारताने 19.4 षटकात 4  विकेटच्या मोबदल्यात 165 धावांचे लक्ष्य पूर्ण केलं. यावेळी मैदानावर विराट कोहलीने 41 चेंडूंचा सामना करत 61 धावा ठोकल्या. यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

दरम्यान, पहिल्या टी-20 सामान्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 17 षटकात 174 धावांचं आव्हान दिलं होतं. सलामीवीर शिखर धवनने धमाकेदार सुरुवात केल्यानंतरही भारताला सामना जिंकता आला नाही. तर दुसरा टी-20 सामना पावसाने रद्द झाला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारताने मालिका बरोबरीत सोडवली आहे.

टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रलियाने प्रथम फलंदाजी करताना डार्सी शॉर्टने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने 28 धावा केल्या. तसेच भारताकडून गोलंदाजी करताना कृणाल पंड्याने 4 तर कुलदिप यादवने 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

टी-20 मालिका

पहिला सामना – 21 नोव्हेंबर

दुसरा सामना – 23 नोव्हेंबर

तिसरा सामना – 25 नोव्हेंबर

कसोटी मालिका

पहिला सामना – 6 डिसेंबर

दुसरा सामना – 14 डिसेंबर

तिसरा सामना – 26 डिसेंबर

चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका

पहिला सामना – 12 जानेवारी

दुसरा सामना – 15 जानेवारी

तिसरा सामना – 18 जानेवारी

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.