AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Afghanistan 2nd T20 : मोठी खुशखबर! भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 पाहण्यासाठी FanCodeचं सबस्क्रिप्शन नको; ‘इथे’ पाहा फुकटात

India vs Afghanistan 2nd Match : फॅनकोडचं सब्सक्रिप्शन घ्यायचं नसेल, तर भारत-अफगाणिस्तान दुसरा टी20 सामना मोफत पाहता येणार आहे. फ्री डिशच्या माध्यमातून कोणतेही अतिरिक्त सब्सक्रिप्शन न घेता चाहत्यांना सामना पाहता येईल, कोणतं असेल चॅनेल?

India vs Afghanistan 2nd T20 : मोठी खुशखबर! भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 पाहण्यासाठी FanCodeचं सबस्क्रिप्शन नको; ‘इथे’ पाहा फुकटात
India vs Afghanistan 2nd T20 Live StreamingImage Credit source: BCCI
| Updated on: Sep 14, 2026 | 9:44 PM
Share

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 7 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दोन्ही संघ दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी-20 सामना 15 सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल, तर नाणेफेक 7 वाजता होणार आहे.

भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-20 कुठे पाहता येणार?

दुसऱ्या टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. सोनी स्पोर्ट्स 3 वर हिंदीमध्ये, तर सोनी स्पोर्ट्स 1 वर इंग्रजीमध्ये सामना पाहता येईल. मात्र, टीव्हीवर सामना पाहण्यासाठी संबंधित चॅनेलचे सब्सक्रिप्शन आवश्यक असेल. ऑनलाइन सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग फॅनकोडवर केले जाणार आहे. त्यामुळे मोबाइल किंवा इतर डिव्हाइसवरून सामना पाहण्यासाठी चाहत्यांना पैसे मोजावे लागू शकतात.

फ्रीमध्ये सामना कुठे पाहता येणार?

फॅनकोडचे सब्सक्रिप्शन घ्यायचे नसेल, तर चाहत्यांसाठी पर्याय उपलब्ध आहे. भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-20 सामना डीडी स्पोर्ट्सवर मोफत पाहता येणार आहे. फ्री डिशच्या माध्यमातून कोणतेही अतिरिक्त सब्सक्रिप्शन न घेता चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येईल. मालिकेतील पहिला सामना डीडी भारतीवर दाखवण्यात आला होता. याआधी महिला आशिया कप 2026च्या अंतिम सामन्याचे प्रक्षेपणही डीडी स्पोर्ट्सवर करण्यात आले होते.

टीम इंडिया संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, यश ठाकूर.

अफगाणिस्तान संघ

इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), नूर रहमान (यष्टीरक्षक), सेदीकुल्ला अटल, दरविश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, नांग्याल खरोती, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, अब्दुल्ला अहमदझाई, नवीन उल हक.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट