Ind vs Aus 2020, 2nd ODI | विराट कोहली-केएल राहुलची झुंजार खेळी, ऑस्ट्रेलियाची टीम इंडियावर 51 धावांनी मात, मालिकाही जिंकली

| Updated on: Nov 29, 2020 | 5:50 PM

या विजयासह ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

Ind vs Aus 2020, 2nd ODI  | विराट कोहली-केएल राहुलची झुंजार खेळी, ऑस्ट्रेलियाची टीम इंडियावर 51 धावांनी मात, मालिकाही जिंकली
Follow us on

सिडनी : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 388 धावाच करता आल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने 89 तर केएल राहुलने 76 धावांची झुंजार खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जोश हेझलवूड आणि अॅडम झॅम्पाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मोईसेस हेनरिक्स आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.  (India vs Australia 2020 Ind vs Aus 2nd ODI Live Score Update)  लाईव्ह स्कोअरकार्ड

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची चांगली सुरुवात राहिली. मयंक अग्रवाल आणि शिखर धवन या जोडीने 58 धावांची सलामी दिली. यानंतर शिखर धवन 30 धावांवर बाद झाला. धवनने 23 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा केल्या. धवन पाठोपाठ मयंक अग्रवालही माघारी परतला. मयंकने 28 धावा केल्या.

सलामी जोडी माघारी परतल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली. मात्र विराटने श्रेयस अय्यरसह डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. यादरम्यान विराटने आपले अर्धशतक पूर्ण केलं. ही जोडी तोडायला मोइसेस हेनरिकेसला यश आले. याने श्रेयसला 38 धावांवर बाद केलं.

श्रेयस अय्यरनंतर केएल मैदानात आला. केएल-विराट या जोडीने चौथ्या विकेटसाठी 72 धावा जोडल्या. यानंतर कर्णधार विराट 89 धावांवर बाद झाला. विराटने 87 चेंडूत 7 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 89 धावा केल्या. विराटनंतर हार्दिक पांड्या मैदानात आला.

केएलने हार्दिकसह पाचव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. ही जोडीने चांगलीच जमली होती. मात्र झॅम्पाने ही जोडी फोडली. झॅम्पाने केएलला 76 धावांवर बाद केलं. केएलने 66 चेंडूत 4 फोर आणि 5 सिक्ससह 76 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके द्यायला सुरुवात केली. रवींद्र जडेजाने 24, हार्दिक पांड्याने 28 धावांची खेळी केली.

त्याआधी ऑस्ट्रेलिया टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी, डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच आणि मार्नस लाबुशानेच्या अर्धशतकी खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचं तगडं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 389 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 104 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने 83 धावांची खेळी केली. मार्नस लाबुशानेने 61 चेंडूत 5 फोरसह 70 धावा केल्या. फिंचने 69 चेंडूत 6 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 60 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने 29 चेंडूत प्रत्येकी 4 फोर आणि सिक्सच्या मदतीने नाबाद 63 धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी, जस्प्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

भारताने मालिका गमावली

टीम इंडियाचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिकंली आहे. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे.

[svt-event title=”टीम इंडियाचा 51 धावांनी पराभव” date=”29/11/2020,5:48PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”टीम इंडियाला सातवा धक्का” date=”29/11/2020,5:07PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”टीम इंडियाची सहावी विकेट” date=”29/11/2020,5:06PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”टीम इंडियाला पाचवा धक्का” date=”29/11/2020,4:46PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”केएल राहुलचे अर्धशतक” date=”29/11/2020,4:22PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”टीम इंडियाला चौथा धक्का, विराट माघारी” date=”29/11/2020,4:04PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”29/11/2020,3:49PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”भारताला तिसरा झटका” date=”29/11/2020,3:12PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक ” date=”29/11/2020,3:09PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”टीम इंडियाला दुसरा धक्का” date=”29/11/2020,2:15PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”टीम इंडियाला पहिला धक्का” date=”29/11/2020,2:12PM” class=”svt-cd-green” ]

 

[svt-event title=”भारताच्या फलंदाजीला सुरुवात, शिखर-मयंक सलामी जोडी मैदानात” date=”29/11/2020,1:38PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचे आव्हान” date=”29/11/2020,1:23PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शतकानंतर स्टीव्ह स्मिथ बाद” date=”29/11/2020,12:27PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”स्टीव्ह स्मिथचे शतक” date=”29/11/2020,12:26PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक” date=”29/11/2020,11:44AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाा दुसरा धक्का” date=”29/11/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का” date=”29/11/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”फिंचचे शानदार अर्धशतक” date=”29/11/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाची शानदार सुरुवात” date=”29/11/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक” date=”29/11/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”भारताचे अंतिम 11 खेळाडू” date=”29/11/2020,8:50AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाचे अंतिम 11 खेळाडू” date=”29/11/2020,8:49AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय” date=”29/11/2020,8:46AM” class=”svt-cd-green” ]

फिंच आणि स्मिथला रोखण्याचं आव्हान

टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर कर्णधार अॅरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांना रोखण्याचं आव्हान असणार आहे. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतकी कामगिरी केली होती. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी तगडं आव्हान दिलं होतं. यामुळे टीम इंडियाला या दुसऱ्या सामन्यात जिंकायचं असेल, तर या दोघांना रोखावं लागेल.

तर कुलदीप-शार्दुलला संधी मिळणार….

पहिल्या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलला दुखापतीमुळे 10 ओव्हर टाकल्यानंतर मैदानाबाहेर जावं लागलं. तर वेगवान गोलंजदाज नवदीप सैनीला कमरेला दुखापत झाली. त्यामुळे जर या दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली, तर सैनीच्या जागी शार्दूल ठाकूर आणि चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते.

टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि थंगारासू नटराजन.

टीम ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झॅम्पा, जोश हेजलवुड, सीन एबॉट, एश्टन एगर, कॅमरन ग्रीन, मोइजेस हेनरिक्स, अँड्रयू टाय, डॅनियल सॅम्स आणि मॅथ्यू वेड.

(India vs Australia 2020 Ind vs Aus 2nd ODI Live Score Update)

संबंधित बातम्या :

India vs Australia 1st ODI  : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव

Photo | IND vs AUS : सिडनी वनडेमध्ये या पाच कारणांमुळे भारताचा पराभव, कांगारुंची दादागिरी!