India vs Australia 2020, 2nd T20 | फिरकीपटू युजवेंद्र चहलला ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
चहलने ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या टी 20 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या होत्या.

सिडनी : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Tour Australia 2020-21) यांच्यात आज (6 डिसेंबर) दुसरा टी 20 सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला सिडनी क्रिकेट ग्राऊंड (Sydney Cricket Ground) येथे 1 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) एक विक्रम करण्याची संधी आहे. India vs Australia 2020 Yuzvendra Chahal gets a chance to break Jaspreet Bumrah’s T20 wicket record
चहलला बुमराहच्या टी 20 मधील विकेट्सचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. तसेच विकेट्सची बरोबरी करण्याचीही संधी आहे. या विक्रमापासून चहल केवळ 2 विकेट्स दूर आहे. बुमराहने आपल्या टी 20 कारकिर्दीत एकूण 49 सामन्यात 59 विकेट्स घेतल्या आहेत. तर चहलने एकूण 43 टी 20 सामन्यात 58 विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे चहलला या सामन्यात 2 विकेट्स घेतल्यास रेकॉर्ड ब्रेक करण्याची तर, 1 विकेट घेतल्यास बरोबरी करण्याची संधी आहे. त्यामुळे चहल या दुसऱ्या टी 20 सामन्यात नक्की कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या टी 20 मध्ये 3 विकेट्स
युजवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या टी 20 सामन्यात 3 विकेट्स घेत महत्वपूर्ण कामगिरी केली. चहलला रवींद्र जाडेजाच्या जागी बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली होती. चहलने या संधीचं सोनं करत 3 विकेट्स मिळवल्या होत्या.
बुमराहाचा 27 वा वाढदिवस
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहचा आज (6 डिसेंबर) वयाची 27 वर्ष पूर्ण केली आहेत. बुमराहने 22 व्या वर्षी टीम इंडियाकडून पदार्पण केलं. सध्या घडीला बुमराह टीम इंडियाच्या गोलंदाजीचा कणा आहे. बुमराहचा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. बुमराह टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटमधील स्टार गोलंदाज आहे. बुमराहने आपल्या यॉर्करच्या अचूक माऱ्याने भल्या भल्या फलंदाजांना बाद केलंय. बुमराहने एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी सामन्यात अनुक्रमे 108, 59 आणि 68 विकेट्स घेतल्या आहेत.
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 11 धावांनी जिंकला. त्यामुळे 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यामुळे हा दुसरा टी 20 सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी भारताला आहे.
संबंधित बातम्या :
Photo | टीम इंडियाच्या ‘या’ 5 स्टार खेळाडूंचा वाढदिवस, तुमचा आवडता खेळाडू कोण?
India vs Australia 2020 Yuzvendra Chahal gets a chance to break Jaspreet Bumrah’s T20 wicket record
