
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून दोन्ह संघामध्ये 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. पहिल्या मॅचमध्ये भारतीय संघाला 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरा सामना आज ॲडलेडमध्ये रंगणार असून आधीच्या सामन्याचा वचपा काढून ही मॅच जिंकण्यास भारतीय संघातील खेळाडू सज्ज आहेत. मात्र या दुसऱ्या वनडे मॅचपूर्वी टीम इंडियाचा युवा खेळाडू शुबमन गिल याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका पाकिस्तानी चाहत्याचे ‘नापाक’ कृत्य दिसून आलं. एका चाहत्याने गिलसमोरच पाकिस्तान झिंदाबादचा नारा दिला, त्यामुळे तोही एक क्षण चक्रावला पण त्यानतर त्याने जी रिॲक्शन दिली त्याचीही सध्या सगळीकडे चर्चा आहे. बघता बघता हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालाय.
नेमकं काय घडलं ?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या मॅचच्या आधी शुबमन गिल हा ॲडलेडच्या रस्त्यांवर फेरफटका मारत होता. ब्लॅक कलरची हुडी, निळी जीन्स आणि डोळ्यांवर गॉगल अशा कूल अवताराती गिल तिथून चालत होता. तेवढ्यात समोरून माणूस आला आणि त्याने हँडशेक करण्यासाठी शुबमनसमोर हात केला. शुबमनने त्याच्याशी हस्तांदोलन केलं खरं, पण तेवढ्यात तो इसम जोरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असं म्हणाला. ते ऐकून पुढे गेलेल्या शुबमनने त्याच्याकडे बघितलं नाही, तो काहीच बोलला नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. गिल तिथून शांतपणे पुढे निघून गेला.
आशिया कप 2025 ट्रॉफी वादावरून भारतीय आणि पाकिस्तानी चाहते आधीच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याचदरम्यान, शुभमन गिलच्या एका व्हिडिओमुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. सुदैवाने, गिलने पाकिस्तानी चाहत्याच्या कृतीवर संयम राखला आणि काहीच न बलोता तो तिथून पुढे निघाला.
A Pakistani fan met Shubman Gill in Adelaide and said, “Pakistan Zindabad.” 🇵🇰🇮🇳🔥 pic.twitter.com/2NVLpjwFo7
— Cric Passion (@CricPassionTV) October 22, 2025
आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सामना
आज ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलिया वि भारत दुसरा वनडे सामना रंगणार आहे. यापूर्वी पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय संघाचा 7 विकेट्सनी पराभव झावा. पावसामुळे प्रभावित झालेल्या त्या सामन्यात प्रत्येक डावात 26 षटके टाकण्यात आली. त्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. तर दुसरा सामना आज अॅडलेड येथे खेळला जाईल. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर आहे आणि मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला अॅडलेडमधील एकदिवसीय सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. भारतीय संघाने ॲडलेडमधील मैदानावर आतापर्यंत 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी ९ 9सामने जिंकले तर एक सामना या मैदानावर बरोबरीत सुटला आहे.