AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 1st ODI Preview | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड भिडणार, पहिल्या सामन्यासाठी विराटसेना सज्ज

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (23 मार्च) पुण्यात (india vs england 1st odi) पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे.

India vs England 1st ODI Preview | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड भिडणार, पहिल्या सामन्यासाठी विराटसेना सज्ज
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (23 मार्च) पुण्यात (india vs england 1st odi) पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे.
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 23, 2021 | 8:41 AM
Share

पुणे : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (23 मार्च) पहिला एकदिवसीय (India vs England 1st ODI) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमध्ये या मॅचचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या पहिल्या सामन्यानिमित्ताने आपण उभय संघातील एकमेकांविरोधातील कामगिरी आणि आव्हान काय असणार आहे, हे पाहणार आहोत. (india vs england 1st odi 2021 at pune preview)

टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ

उभय संघात आतापर्यंत एकूण 100 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ आहे. भारताने इंग्लंडचा 53 सामन्यात धुव्वा उडवला आहे. तर इंग्लंडने टीम इंडियावर 42 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. 2 सामने बरोबरीत सुटले आहेत. तर 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.

वरील आकडेवारीवरुन टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ दिसत आहे. त्यामुळे आता या एकदिवसीय मालिकेत टीम इंडिया ही कामगिरी कायम राखणार की इंग्लंड हा इतिहास बदलणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

पुण्यातील कामगिरी

उभय संघात पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये 1 वनडे सामना खेळवण्यात आला होता. हा सामना 15 जानेवारी 2017 मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारताला विजयासाठी 351 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र तरीही इंग्लंडला या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. भारताने हा सामना 11 चेंडूआधी 7 विकेट्स गमावून जिंकला होता.

नेट्समध्ये जोरदार सराव

दरम्यान या सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू जोरदार सराव करत आहे. रोहित शर्मा, केएल राहुल यांनी सोमवारी मैदानात कसून सराव केला. आयसीसीने सरावादरम्यानचे फोटो ट्विट केले आहेत.

टीम इंडियाला नंबर 1 होण्याची संधी

टीम इंडियाला या मालिकेत क्रमवारीत अव्वल क्रमांक गाठण्याची संधी आहे. आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या तर इंग्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. भारताला नंबर 1 होण्यासाठी ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकावी लागणार आहे. त्यामुळे टीम इंडिया नंबर 1 होण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

इंग्लंडसमोर ‘विराट’ आव्हान

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्मात आहे. त्याने टी 20 मालिकेत 3 नाबाद अर्धशतकं झळकावली होती. तसेच रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवही फटकेबाजीसाठी उत्सुक आहेत. यामुळे इंग्लंडसमोर या तिकडीला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

टीम इंडियासाठी मार्क वुड्स डोकेदुखी

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड. मार्क वुड टीम इंडियासाठी टी 20 मालिकेत डोकेदुखी ठरला. त्याने वेळोवेळी भारताला धक्के दिले. त्यामुळे भारताला मार्क वुड विरुद्ध रणनिती आखावी लागणार आहे.

इंग्लंडची टीम

इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, जॅक बॉल आणि डेव्हिड मलान.

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या :

India vs England, 1st Odi | पहिल्या सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीची मोठी घोषणा,रोहित-शिखर सलामीला येणार

India vs England Odi Series 2021 | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, एकूण 100 वेळा आमनेसामने, कोण वरचढ, कोण कमजोर?

(india vs england 1st odi 2021 at pune preview)

Follow Us
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती