India vs England 3rd Test | अहमबदाबादमध्ये टीम इंडियाकडून इंग्लंडला पराभवासह दुहेरी धक्का, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील आव्हान संपुष्टात

| Updated on: Feb 25, 2021 | 9:55 PM

टीम इंडियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात (india vs england 3rd test) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात इंग्लंडचा 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

India vs England 3rd Test | अहमबदाबादमध्ये टीम इंडियाकडून इंग्लंडला पराभवासह दुहेरी धक्का, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील आव्हान संपुष्टात
टीम इंडियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात (india vs england 3rd test) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात इंग्लंडचा 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला.
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडियाने अहमदाबादमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (india vs england 3rd test) पाहुण्या इंग्लंडवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 49 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाच्या शुबमन गिल (Shubaman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या सलामी जोडीने पूर्ण केलं. रोहित आणि शुबमन या सलामी जोडीने अनुक्रमे नाबाद 25 आणि 15 धावा केल्या. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. यासह इंग्लंडचं भारतात कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न अधूरं राहिलं. दरम्यान या पराभवासह इंग्लंडला दुसरा झटका बसला आहे. या पराभवामुळे इंग्लंडचे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील (icc world test championship final) अंतिम सामन्यात खेळण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. (india vs england 3rd test england out of icc world test championship final)

टीम इंडियाचं जोरदार पुनरागमन

या उभय संघातील कसोटी मालिकेच्या निकालावर टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या दुसऱ्या संघाचं भवितव्य ठरणार होतं. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने आधीच धडक मारली आहे. या एका जागेसाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ स्पर्धेत होते. इंग्लंडने चेन्नईतील पहिली कसोटी जिंकत आपली दावेदारी सिद्ध केली होती. पण त्यानंतरचे 2 सामने जिंकत भारताने जोरदार पुनरागमन केलं. भारताने इंग्लंडवर चेन्नईतील दुसऱ्या सामन्यात 317 धावांनी तर तिसऱ्या कसोटीत 10 विकेट्सने अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. यासह भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. तर इंग्लंडचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा  असेल.

संबंधित बातम्या :

Virat Kohli | शानदार विजयासह कर्णधार कोहलीचा ‘विराट’ विक्रम, ‘कॅप्टन कुल’ धोनीचा रेकॉर्ड ब्रेक

IND vs ENG 3rd Test : अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, कसोटीत 400 तर 600 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा पार

Axar Patel | ना जलेबी, ना फाफडा, अक्षर पटेल आपडा, लोकल बॉय अक्षरला 11 विकेट

(india vs england 3rd test england out of icc world test championship final)