India vs England 5th T20i | टी 20 मालिका कोण जिंकणार? ‘आकाश’वाणीची भविष्यवाणी, म्हणाला….

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (20 मार्च) टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना (India vs England 5th T20i) खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकाही जिंकेल, अशी भविष्यवाणी (Aakash Chopra prediction) आकाश चोप्राने केली आहे.

India vs England 5th T20i | टी 20 मालिका कोण जिंकणार? 'आकाश'वाणीची भविष्यवाणी, म्हणाला....
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (20 मार्च) टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना (India vs England 5th T20i) खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकाही जिंकेल, अशी भविष्यवाणी (Aakash Chopra prediction) आकाश चोप्राने केली आहे.
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 3:13 PM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (India vs England 5th T20i) आज (20 मार्च) टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिल्या 4 सामन्यांपैकी प्रत्येकी 2 सामने दोन्ही संघांनी जिंकले आहेत. त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने पाचवा सामना निर्णायक असणार आहे. दोन्ही संघांचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान याआधी टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) ही मालिका कोण जिंकणार, याबाबत भविष्यवाणी केली आहे. (India vs England 5th T20i 2021 Aakash Chopra prediction about series)

आकाश चोप्रा काय म्हणाला?

“पाचव्या सामन्यावर टीम इंडियाची मजबूत पकड असेल. त्यामुळे टीम इंडिया हा सामना जिंकेल. यासह मालिकाही जिंकेल”, असा अंदाज आकाशने व्यक्त केला आहे. तसेच टीम इंडियाने या सामन्यात 5 ऐवजी 6 गोलंदाजांसह मैदानात उतरावे, असा सल्लाही आकाशने दिला आहे. आकाश आपल्या युट्युब चॅनेलवर बोलत होता. यावेळस त्याने ही भविष्यवाणी केली.

विराट आणि रोहितबाबत काय म्हणाला?

“टीम इंडिया इंग्लंडच्या तुलनेत मजबूत आहे. भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. रोहित शर्मा गेल्या 2 सामन्यात चमकदार कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे तो या सामन्यात धमाकेदार खेळी करु शकतो. तसेच विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवमुळे टीम इंडियाची बॅटिंगसाईड आणखी भक्कम झाली आहे. विराट नेहमी निर्णायक सामन्यात शानदार खेळी करतो. रोहित आणि विराटमुळे टीम इंडिया या सामन्यासह मालिकाही जिंकेल”, असं भाकित आकाशने व्यक्त केलं आहे.

अतिरिक्त गोलंदाज घ्या

“एखादा गोलंदाज या सामन्यात महागडा ठरला तर तुम्हाला दुसऱ्या गोलंदाजाचा पर्याय असेल. त्यामुळे विराटसेनेने 5 ऐवजी 6 गोलंदाजांसह मैदानात उतरायला हवं”, असा सल्ला आकाशने दिला आहे.

पाचव्या सामन्यात कोण खेळणार?

“या सामन्यात कोण निर्णायक कामगिरी करणार, याबाबतही आकाशने अंदाज वर्तवला आहे.टीम इंडियाकडून विराट कोहली तर इंग्लंडकडून जोस बटलर चांगली फलंदाजी करतील. तर गोलंदाजीमध्ये भारताकडून राहुल चाहर निर्णायक भूमिका बजावेल. तसेच इंग्लंडकडून मार्क वुड 2 विकेट्स पटकावेल”, असं आकाशला वाटतं. त्यामुळे आकाशची भविष्यवाणी खरी ठरणार की खोटी, हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम

इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

India vs England 5th T20i Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, सामना कधी कुठे आणि केव्हा?

India vs England 5th T20i Preview | टीम इंडिया की इंग्लंड, मालिका कोण जिंकणार?

(India vs England 5th T20i 2021 Aakash Chopra prediction about series)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.