India vs England T20I | टी 20 मालिका विजयानंतर विराटसेनेला मोठा झटका

| Updated on: Mar 21, 2021 | 8:18 PM

टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या (india vs england 5th t2oi) पाचव्या टी 20 सामन्यात आवश्यक ओव्हर रेट राखला नाही. त्यामुळे विराटसेनेवर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी एकूण सामन्याच्या मानधनापैकी 40 टक्के (slow over rate) दंड ठोठावला आहे.

India vs England T20I | टी 20 मालिका विजयानंतर विराटसेनेला मोठा झटका
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या (india vs england 5th t2oi) पाचव्या टी 20 सामन्यात आवश्यक ओव्हर रेट राखला नाही. त्यामुळे विराटसेनेवर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी एकूण सामन्याच्या मानधनापैकी 40 टक्के (slow over rate) दंड ठोठावला आहे.
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडचा पाचव्या टी 20 (india vs england 5th t2oi) सामन्यात पराभव केला. यासह भारताने 3-2 च्या फरकाने ही मालिका जिंकली. भारताचा हा सलग 6 वा टी 20 मालिका विजय ठरला. दरम्यान या शानदार मालिका विजयानंतरही भारताला मोठा झटका बसला आहे. या पाचव्या सामन्यात (Slow Over Rate) भारताने आवश्यक तो ओव्हर रेट  राखला नाही. यामुळे टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूवर दंडात्मक कारवाई केली आहे. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली आहे. एकूण सामन्याच्या मानधनाच्या 40 टक्के रक्कम ही दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. (india vs england 5th t2oi team india fined 40 percent of match fee due to slow over rate)

एकूण मानधनाच्या 40 टक्के दंड

क्रिकेटच्या नियमांनुसार ठराविक वेळेत अपेक्षित ओव्हर्सचा खेळ होणं अपेक्षित असतं. मात्र भारताने पाचव्या सामन्यात ठराविक वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या. त्यामुळे भारताकडून आयसीसीच्या 2.22 या नियमांचं उल्लंघन झालं. या नियमानुसार प्रत्येक ओव्हर मागे 20 टक्के मानधन दंड स्वरुपात आकारण्याची तरतूद आहे. भारताकडून या नियमांचं भंग झाला. भारताने 2 ओव्हर कमी टाकल्या. यामुळे भारताच्या प्रत्येक खेळाडूला 40 टक्के रक्कमेला मुकावे लागणार आहे.

दुसऱ्या सामन्यातही दंडात्मक कारवाई

टीम इंडियावर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी दुसऱ्या सामन्यातही विराटसेनेला अपेक्षित षटकगती राखण्यास अपयश आले होते. तेव्हा भारताने 1 ओव्हर कमी फेकली होती. यामुळे भारताला सामन्याच्या मानधनापैकी 20 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आला होता.

23 मार्चपासून एकदिवसीय मालिका

दरम्यान टी 20 मालिकेनंतर उभय संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील तिनही सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

इंग्लंडची 14 सदस्यीय टीम

इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले आणि मार्क वुड

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या :

India vd England 2nd T2OI | शानदार विजयानंतरही टीम इंडियाला मोठा धक्का

India vs England Odi Series 2021 | टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडची घोषणा

(india vs england 5th t2oi team india fined 40 percent of match fee due to slow over rate)