India vs England T 20 | जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीचा चहलला फायदा, युझवेंद्रला ‘हा’ रेकॉर्ड करण्याची संधी

| Updated on: Mar 11, 2021 | 4:33 PM

जसप्रीत बुमराहच्या ( jasprit bumrah) अनुपस्थितीत युझवेंद्र चहलला (yuzvendra chahal) मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

India vs England T 20 | जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीचा चहलला फायदा, युझवेंद्रला हा रेकॉर्ड करण्याची संधी
जसप्रीत बुमराहच्या ( jasprit bumrah) अनुपस्थितीत युझवेंद्र चहलला (yuzvendra chahal) मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 12 मार्चपासून 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला (India vs England T 20) सुरुवात होत आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे त्याने या टी 20 मालिकेतून माघार घेतली आहे. मात्र बुमराहच्या माघार घेण्याचा निर्णयाचा फायदा फिरकीपटू युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) होणार आहे. (india vs england t 20 series 2021 In the absence of Jasprit Bumrah Yujvendra Chahal has a chance to take the most wickets)

चहलला फायदा कसा?

टीम इंडियाकडून टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट्सच्या रेकॉर्डच्या बाबतीत युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बुमराहने 50 टी 20 सामन्यात 20.25 सरासरीने 59 विकेट्स घेतल्या आहेत. तर चहलने 45 मॅचमध्ये 24.67 सरासरीने 59 विकेट्स मिळवल्या आहेत. बुमराहने लग्नामुळे टी 20 सीरिजमधून माघार घेतली आहे. यामुळे चहलला टीम इंडियाकडून टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. त्यामुळे चहलला 5 सामन्यात मोठी कामगिरी करण्याची संधी आहे.

चहलला अवघ्या 1 विकेटची आवश्यकता

त्यामुळे आता चहलला बुमराहचा रेकॉर्ड मोडण्यासाठी अवघ्या 1 विकेट्सची आवश्यकता आहे. चहल 1 विकेट घेताच टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल.

12 मार्चला पहिला सामना

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना उद्या 12 मार्चला खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

India vs Engalnd 1st T 20 | कसोटीनंतर रंगणार टी 20 चा थरार, पहिल्या सामन्यात कोणाला संधी, कोणाला डच्चू?

Ind Vs Eng : भारतीय संघाला झटका, हा खेळाडू फिटनेस टेसमध्ये नापास, सिरीजमधूनही बाहेर!

(india vs england t 20 series 2021 In the absence of Jasprit Bumrah Yujvendra Chahal has a chance to take the most wickets)