Ind Vs Eng : भारतीय संघाला झटका, हा खेळाडू फिटनेस टेसमध्ये नापास, सिरीजमधूनही बाहेर!

लेगस्पिनगर वरुण चक्रवर्ती (varun Chakravarthy) फिटनेस टेस्टमध्ये नापास झाला आहे.

Ind Vs Eng : भारतीय संघाला झटका, हा खेळाडू फिटनेस टेसमध्ये नापास, सिरीजमधूनही बाहेर!
बीसीसीआयने (bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया (team india) विरुद्ध इंग्लंड (odi series against england) यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 2:08 PM

मुंबई :  लेगस्पिनगर वरुण चक्रवर्ती (varun Chakravarthy) फिटनेस टेस्टमध्ये नापास झाला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड  संघादरम्यानच्या टी 20 मॅचमध्ये (India Vs England T20) वरुण खेळणार नाही किंबहुना या सिरीजमधून तो आऊट झाला आहे. India Vs England T20 varun Chakravarthy Fitness test Fail

खांद्याच्या दुखापतीतून बरा झाल्यामुळे वरुण चक्रवर्तीची निवड करण्यात आली होती. याच कारणामुळे तो ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाऊ शकला नव्हता. एनसीएमध्ये त्याने रिहॅबिलिटेशन पूर्ण केलं होतं तसंच तो पहिल्याप्रमाणे थ्रो करु शकत होता. खरं तर, यो-यो चाचणी दोनदा पास करण्यात त्याला अपयश आले. ज्यामध्ये त्याला दोन किमी पळावं लागणार होतं. मात्र यातही तो नापास झाला.

फिट नसणाऱ्या खेळाडूची निवड का?

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात निवड समितीने ऑक्टोबरपासून तामिळनाडूसाठीही कोणताही सामना न खेळणार्‍या एका खेळाडूची निवड का केली?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मुश्ताक अली ट्ऱॉफी दरम्यान तो दुखापतीतून जात होता, हे खरंय मात्र त्यानंतर झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील त्याने एकही मॅच खेळली नाही. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या सामन्यांच्या आधारे आपण त्याच्या फिटनेसचं परीक्षण कसं करु शकता? असाही सवाल आता उपस्थित होत आहे.

नव्याने समजत असलेल्या वृत्तानुसार भारतीय संघात राहुल चहरचा समावेश होऊ शकतो. राहुल तेवतिया अहमदबादमध्ये भारतीय संघासोबत ट्रेनिंग करत आहे. तो आपल्या दुसऱ्या फिटनेस टेस्टची वाट पाहत आहे. टी-ट्वेन्टी सिरीज नंतर पुण्यात तीन एकदिवसीय सामने पार पडणार आहेत.

टी 2O सीरिजचे वेळापत्रक

12 मार्च | पहिली टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

14 मार्च | दुसरी टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

16 मार्च | तिसरी टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

18 मार्च | चौथी टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

20 मार्च | पाचवी टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

या टी 20 मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

हे ही वाचा :

India vs England T 20I | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत ‘हा’ खेळाडू मॅचविनर ठरणार, व्हीव्हीएस लक्ष्मणची भविष्यवाणी

India vs England T20 | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या ‘या’ स्टार खेळाडूला संधी

India vs England | टीम इंडियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.