India vs England T 20I | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत ‘हा’ खेळाडू मॅचविनर ठरणार, व्हीव्हीएस लक्ष्मणची भविष्यवाणी

India vs England T 20I | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत 'हा' खेळाडू मॅचविनर ठरणार, व्हीव्हीएस लक्ष्मणची भविष्यवाणी
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 12 मार्चपासून टी 20 मालिका (india vs england t 20 series 2021) खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 12 मार्चपासून टी 20 मालिका (india vs england t 20 series 2021) खेळवण्यात येणार आहे.

sanjay patil

| Edited By: Rohit Dhamnaskar

Mar 09, 2021 | 7:15 AM

मुंबई :रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याने परिपक्वतेने कसोटी मालिकेत फलंदाजी केली. तो टीम इंडियासाठी (Team India) मॅचविनर बनू शकतो. आम्ही पंतला आयपीएलमध्ये (IPL) दिल्लीसाठी (DC) दबावात्मक स्थितीत मॅच जिंकून देताना पाहिलं आहे. पंतला एकदा सुर गवसला की तो प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला आपल्या खेळीने घाम फोडू शकतो. पंतला इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत (India vs Engalnd T 20) स्थान देऊन योग्य केलं”, अशी भविष्यवाणी टीम इंडियाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (Vvs Laxman Prediction) म्हणाला. लक्ष्मण स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लॅन या विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस तो बोलत होता. (Rishabh Pant will be the match winner in T20 series against England predicts VVS Laxman)

लक्ष्मण काय म्हणाला?

“पंतला त्याच्या एक किंवा दोन डावातील कामगिरीवर जज करु नका. मी फक्त इतकीच आशा करतो की, पंतबाबतचा कोणताही निर्णय हा त्याच्या 2 डावातील कामगिरीवरुन घेऊ नका. जर आपण आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने पाहत असू तर पंतला खेळण्याची संधी द्यायला हवी. त्यामुळे पंतमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. पंतमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. तो सामना जिंकून देऊ शकतो”, असंही लक्ष्मणने नमूद केलं.

पंतची शानदार कामगिरी

पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करतोय. पंतने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत निर्णायक भूमिका बजावली. पंतचा या दोन्ही मालिका विजयांमध्ये मोलाचा वाटा राहिला आहे. तसेच पंत 2021 मध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पंतने या वर्षात भारताकडून सर्वाधिक 515 धावा केल्या आहेत. पंतला गेल्या काही महिन्यांपासून चांगला सूर गवसला आहे. त्यामुळे तो आता इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टी 2O सीरिजसाठी उत्सुक आहे.

टी 2O सीरिजचे वेळापत्रक

12 मार्च | पहिली टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

14 मार्च | दुसरी टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

16 मार्च | तिसरी टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

18 मार्च | चौथी टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

20 मार्च | पाचवी टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

या टी 20 मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम :

इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

India vs England T20 | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या ‘या’ स्टार खेळाडूला संधी

India vs England | टीम इंडियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

(Rishabh Pant will be the match winner in T20 series against England predicts VVS Laxman)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें