India vs England T20 Series 2021 | टीम इंडियाचा सलग सहावा टी 20 मालिका विजय

| Updated on: Mar 20, 2021 | 11:46 PM

टीम इंडियाने इंग्लंडवर 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत (india vs england t 20 series 2021) 3-2 ने विजय मिळवला. या विजयासह भारताचा हा सलग 6 वा टी 20 मालिका (team indias sixth consecutive t20 series win) विजय ठरला.

India vs England T20 Series 2021 | टीम इंडियाचा सलग सहावा टी 20 मालिका विजय
टीम इंडियाने इंग्लंडवर 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत (india vs england t 20 series 2021) 3-2 ने विजय मिळवला. या विजयासह भारताचा हा सलग 6 वा टी 20 मालिका (team indias sixth consecutive t20 series win) विजय ठरला.
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडचा निर्णायक पाचव्या टी 20 (India vs England 5th t20 match) सामन्यात 36 धावांनी विजय मिळवला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 188 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तर जॉस बटलरने 52 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने 2 फलंदाजांना माघारी धाडलं. यासह भारताने 5 सामन्यांची मालिका 3-2 च्या फरकाने जिंकली. यासह टीम इंडियाचा हा नोव्हेंबर 2019 पासूनचा सलग 6 वा टी 20 मालिका विजय ठरला.(india vs england t 20 series 2021 team indias sixth consecutive t20 series win)

ऑस्ट्रेलियाला 2-1 ने धूळ चारली

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 मालिका (India Tour Australia 2020-21) खेळवण्यात आली. या 3 सामन्यांच्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव करत मालिका जिंकली. या सामन्यातील पहिले 2 सामने टीम इंडियाने जिंकले होते. तर शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया जिंकला होता.

न्यूझीलंडचा 5-0 सुपडा साफ

जानेवारी-फेब्रुवारी 2020 दरम्यान टीम इंडिया न्यूझीलंड (India Tour New Zealand 2020) दौऱ्यावर होती. या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळण्यात आली. टीम इंडियाने न्यूझीलंडचा त्यांच्याच घरात 5-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव केला.

श्रीलंकेवर 2-1 ने मात

टीम इंडियाची 2020 या नववर्षाची सुरुवात टी 20 मालिकेने झाली. टीम इंडियाने श्रीलंकेविरोधात (Sri Lanka Cricket) 3 सामन्यांची मालिका खेळली. या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला. यामुळे मालिका विजयासाठी दोन्ही संघाना उर्वरित 2 सामने जिंकणं बंधनकारक होत. मात्र टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकत मालिका जिंकली. यासह टीम इंडियाने टी 20 मालिका विजयाची हॅटट्रिक साजरी केली.

वेस्टइंडिजवर 2-1 ने विजय

बांगलादेशविरोधात टी 20 मालिकेनंतर लगेचच टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरोधात (West Indies Cricket Team) 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळली. यामध्ये टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने सीरिज जिंकली. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला. तर विंडिजने दुसरा सामना जिंकत पुनरागमन केलं. यामुळे मालिकेत दोन्ही संघांनी बरोबरी साधली. मात्र टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात विंडिजला पराभवाची धूळ चारत मालिकेवर नाव कोरलं.

बांगलादेशवर 2-1 ने विजय

बांगलादेश (Bangladesh Cricket Team) विरुद्ध टीम इंडिया यांच्यात नोव्हेंबर 2019 मध्ये 3 सामन्याची मालिका खेळण्यात आली. या मालिकेतील सामने अनुक्रमे 3, 7 आणि 10 नोव्हेंबरला खेळण्यात आले. बांगलादेशने या मालिकेची विजयी सुरुवात केली. बांगलादेशने पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय मिळवला. मात्र त्यानंतर टीम इंडियाने उर्वरित 2 ही सामने जिंकले आणि मालिका खिशात घातली.

संबंधित बातम्या :

India vs England 2021, 5th T20I | शार्दुल-भुवनेश्वरचा भेदक मारा, विराट-रोहितची फटकेबाजी, टीम इंडियाची इंग्लंडवर 36 धावांनी मात, 3-2 ने मालिका खिशात

(india vs england t 20 series 2021 team indias sixth consecutive t20 series win)