IND vs NZ: टीम इंडियाला धक्का! Playing XI मधून अचानक ‘हा’ खेळाडू OUT, बीसीसीआयकडून रिप्लेसमेंटची घोषणा; कारण काय?

IND vs NZ 2nd Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने एका खेळाडूला बदलले आहे. याचे कारण काय आणि नियम काय सांगतात, ते जाणून घ्या.

IND vs NZ: टीम इंडियाला धक्का! Playing XI मधून अचानक हा खेळाडू OUT, बीसीसीआयकडून रिप्लेसमेंटची घोषणा; कारण काय?
Akash Deep out Prasidh Krishna in
| Updated on: Nov 29, 2026 | 9:09 AM

India vs New Zealand 2nd Test: क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघाच्या Playing XI बदल केला असून याची अपडेट बीसीसीआयने स्वतः दिली आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने एका खेळाडूला बदलले असून, आकाश दीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान दिले आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की, विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला का बदललं? आकाश दीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला आणण्यामागचे कारण काय होते? ही घडामोड क्राइस्टचर्चमध्ये खेळाच्या तिसऱ्या दिवशी, अगदी त्याच वेळी घडली जेव्हा न्यूझीलंडचा दुसरा डाव सुरू झाला होता. चला याच कारण जाणून घेऊ.

बीसीसीआयने बदलाला मंजुरी दिली!

बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया हँडल्सद्वारे जाहीर केले की, आकाश दीपला दुखापत (कन्कशन) झाल्यामुळे त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने पुढे असेही नमूद केले की, आकाश दीप सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे.

Loading...

आकाश दीपला कधी झाली दुखापत

तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, आकाश दीपला नेमकी दुखापत कधी झाली? तर ही घटना भारतीय डावाच्या ५३ व्या षटकात घडली. काईल जेमिसनचे दोन बाऊन्सर त्याच्या हेल्मेटवर आदळले. पहिला बाऊन्सर हेल्मेटच्या ग्रीलवर लागला, तर चार चेंडूंनंतर आलेला दुसरा बाऊन्सर थेट हेल्मेटच्या वरच्या भागावर आदळला. या धक्क्यांनंतर त्याला त्रास झाला. त्याचा मदतीसाठी फिजिओ मैदानावर आले आणि त्यांनी त्याची तपासणी केली. दुसऱ्या धक्क्यानंतर त्याचे हेल्मेटही खराब झाल्याने बदलावे लागले.

आकाश दीपची खेळी!

क्राइस्टचर्च कसोटीच्या पहिल्या डावात आकाश दीपने ५२ चेंडूंत २९ धावा केल्या. या खेळीदरम्यान, त्याने आठव्या विकेटसाठी ध्रुव जुरेलसोबत ४६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली.

दुखापतीमुळे बदली खेळाडू घेण्यासंबंधीचा नियम काय सांगतो?

आयसीसीनुसार, डोक्याला दुखापत झाल्यास बदली खेळाडू घेण्याच्या नियमानुसार, टीम इंडियाने प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आकाश दीपला संधी दिली आहे. हा नेमका नियम काय हे जाणून घ्या. तर हा नियम संघाला डोक्याला दुखापत झाल्यास त्याच्या जागी तशाच प्रकारच्या खेळाडूला बदली म्हणून आणण्याची परवानगी देतो. टीम इंडियाने नेमके तेच केले आहे. आता त्यांनी प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आकाश दीपला संघात घेतले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us