Ind vs Pak, Asian Games 2026 Final Live: भारत-पाक महामुकाबला, कोणाला मिळणार सुवर्णपदक?
India vs Pakistan Asian Games Final 2026 Live Score Updates in Marathi : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकासाठी भारत आणि पाकिस्तान असा सामना रंगणार आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तानचा संघ : साहिबजादा फरहान (कर्णधार), माझ सदाकत, उस्मान खान (विकेटकीपर), सैम अयुब, हसन नवाज, अब्दुल समद, अराफत मिन्हास, अहमद दानियाल, मोहम्मद वसीम जूनियर, अबरार अहमद, सुफियान मोकीम
-
हस्तांदोलन केले की नाही?
भारताने नाणेफेक जिंकून अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि साहिबजादा फरहानने हस्तांदोलन केले नाही. भारताने आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणतेही मोठे बदल केले नाहीत.
-
-
भारताची प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल नाही
सेमीफायनलमध्ये भारताची श्रीलंकेविरुद्ध जशी प्लेइंग इलेव्हन होती तशीच प्लेइंग इलेव्हनही पाकिस्तानच्या संघाविरुद्ध आहे. एकही बदल झालेला नाही.
-
IND vs PAK Match: भारताची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तानविरुद्ध भारताचा संघ: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह
-
IND vs PAK Final: नाणेफेक कोणी जिंकली?
भारत पाकिस्तान सामन्याचे नाणेफेक पार पडले असून हे नाणेफेक हे भारतीय संघाने जिंकले आहे, आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
-
भारताच्या सुवर्णपदक जिंकण्याची शक्यता जास्त
हा सामना भारताचे हंगामी मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासाठी आव्हानात्मक असेल. पाकिस्तानचे नेतृत्व साहिबजादा फरहान करत असून, त्यांच्या संघात पीएसएलमध्ये चांगली कामगिरी केलेले अनेक खेळाडू आहेत. भारतीय संघाप्रमाणे पाकिस्तानकडे आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंनी भरलेला मजबूत संघ नाही. भारताने या स्पर्धेत आपला मुख्य संघ पाठवला असून, जसप्रीत बुमराहसारखे अनुभवी वेगवान गोलंदाजही संघात आहेत. त्यामुळे, भारतीय संघाच्या सुवर्णपदक जिंकण्याची शक्यता जास्त आहे. लक्ष्मण आणि अय्यर यांना माहित आहे की, या सामन्यात सुवर्णपदक जिंकले तरी त्यांना फारशी प्रशंसा मिळणार नाही, पण एका तरुण पाकिस्तानी संघाविरुद्ध रौप्यपदकावर समाधान मानणे त्यांना मान्य होणार नाही.
-
भारतीय खेळाडू हस्तांदोलन करणार का?
गेल्या वर्षीपासून, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, भारतीय खेळाडूंनी आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले आहे. आशियाई खेळांच्या अंतिम सामन्यांपूर्वी किंवा नंतर खेळाडू हस्तांदोलन करतील याची शक्यता खूपच कमी आहे. तथापि, सध्याच्या आशियाई खेळांमध्ये, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि हॉकीमधील सामन्यांनंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडू हस्तांदोलन करताना आणि एकमेकांना मिठी मारताना दिसले आहेत.
-
वैभव खेळणार की नाही?
फायनल सामन्यात आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वैभव सूर्यवंशीला संधी मिळते की नाही यावर विशेष लक्ष असणार आहे.
-
नाणेफेक किती वाजता होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल सामना लवकरच सुरु होणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे 9:30 वाजता होणार आहे.
भारतीय पुरुष क्रिकेट संघ आज आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकासाठी खेळणार आहेत. सुवर्णपदकाचा फायनल सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल. उपांत्य फेरीत भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकन संघाचा सामना करत १२४ धावांच्या मोठ्या फरकाने सहज विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर पाकिस्तानी संघाने बांगलादेशला पराभूत करून सुवर्णपदकाच्या सामन्यात आपले स्थान निश्चित केले. आता सर्वांचे लक्ष या दोन संघांमधील सामन्यावर असेल, जो भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होईल. जर या सामन्यात पाऊस पडला तर सुवर्णपदक संयुक्तरित्या दिले जाईल. जर पाऊस आला तर भारताचेच नुकसान होईल हे मात्र पक्के कारण जर सामना झाला तर भारतीय संघ जिंकेल. पाकिस्तानसाठी पाऊस मात्र गोल्डन कामगिरी करेल.