AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Champions Trophy 2017 Final मॅचसाठी फिक्सिंग केली होती, गंभीर आरोपाने क्रिकेटविश्वात खळबळ

IND vs PAK Match Champions Trophy 2017: भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ फायनल सामन्याबद्दल एक मोठी खळबळजनक गोष्ट आता समोर आली आहे.

IND vs PAK Champions Trophy 2017 Final मॅचसाठी फिक्सिंग केली होती, गंभीर आरोपाने क्रिकेटविश्वात खळबळ
| Updated on: Oct 14, 2026 | 10:46 AM
Share

IND vs PAK Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच चर्चेचा विषय असतो. क्रिकेटचे कट्टर चाहते या महामुकाबलासाठी नेहमीच तयारीत असतात. २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना जेव्हा रंगला आणि भारताने सामना गमावला तेव्हा भारतीय क्रिकेट फॅन्सला सर्वात जास्त दु:ख झाले. आता याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी उपांत्य फेरीच्या सामन्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. त्याच्या मते, आयोजकांना कोणत्याही परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवायचा होता म्हणून इंग्लंडसोबत अन्याय केला.

मोईन अलीने हा खुलासा ‘बियर्ड बिफोर विकेट’ या यूट्यूब शोमध्ये सहकारी खेळाडू आदिल रशीद आणि पाकिस्तानी लेग-स्पिनर शादाब खान यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान केला.  त्याने सांगितले की, भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी एक अगदी नवीन आणि ताजी खेळपट्टी वापरण्यात आली होती. याउलट, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा उपांत्य सामना कार्डिफमधील एका जुन्या आणि खराब झालेल्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला.

मोईन अली म्हणाला, “हे माझे वैयक्तिक मत आहे. मला वाटले की आयोजकांना अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यातच व्हावा असे वाटत होते. त्यावेळी आमचा संघ खूप मजबूत होता आणि आम्ही कोणालाही हरवू शकलो असतो. पण जुन्या खेळपट्टीमुळे आमच्यासाठी अडचणी निर्माण झाल्या, ज्याचा फायदा पाकिस्तानने मोहम्मद अमीर आणि हसन अली यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे घेतला.”

मोईन अलीने पुढे कबूल केले की,” त्या दिवशी पाकिस्तानने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. ते कदाचित जिंकलेच असते, पण ज्या प्रकारे खेळपट्टी निवडली होती, त्यावरून हे स्पष्ट होते की भारत-पाकिस्तान अंतिम सामना खेळवणे हाच एकमेव उद्देश होता.”

२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात, पाकिस्तानने उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंडला २११ धावांवर बाद केले, सहजपणे लक्ष्य गाठले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, भारताने बांगलादेशला ९ गडी राखून पराभूत करून विजेतेपदाच्या सामन्यासाठी पात्रता मिळवली. अखेरीस, पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून ट्रॉफी जिंकली. भारतीय फॅन्सला तेव्हा सर्वात मोठा धक्का बसला.

Follow Us
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?