
Gautam Gambhir Video : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टेस्ट सीरीजनंतर आता वनडे मालिका होणार आहे. कसोटी मालिकेत भारताचा दारुण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने 2-0 ने ही सीरीज जिंकली. या पराभवामुळे टीम इंडियाची नाचक्की सुरु आहे. आता निदान वनडे मालिकेत तरी भारताने पराभवाची सव्याज परतफेड करावी अशी टीम इंडियाच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. पण त्याआधी हेड कोच गौतम गंभीर यांना बरच काही ऐकावं लागत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला वनडे येत्या 30 नोव्हेंबरला रांचीमध्ये होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी टीम इंडियाने जोरदार सराव केला. यावेळी हेड कोच गौतम गंभीर मैदानावर उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्याबाबतीत अशी एक गोष्ट घडली, ज्याची कोणी अपेक्षा केली नव्हती. टीम इंडियाची प्रॅक्टिस पाहण्यासाठी काही फॅन्स आले होते. रांची स्टेडिअमच्या स्टँडमध्ये बसून ते गौतम गंभीर यांची खिल्ली उडवत होते. गौतम गंभीर टीमच्या खेळाडूंसोबत ट्रेनिंग करत होते. त्यावेळी फॅन्स त्यांना ट्रोल करत होते. गंभीर यांनी याकडे अजिबात लक्ष दिलं नाही.
रांची स्टेडिअममध्ये आलेले हे प्रेक्षक गौतम गंभीर तुम्ही कोचिंग सोडून द्या म्हणून ओरडत होते. फॅन्सच्या आवाजाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात तो म्हणतोय की, ‘घरात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3-0 ने हरलात. घरात जिंकू शकत नाहीत, 2027 चा वर्ल्ड कप विसरा’ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावण्याचं खापर हेड कोच म्हणून गौतम गंभीर यांच्यावर फोडण्यात आलं. त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. कोलकातापाठोपाठ टीम इंडिया गुवाहाटीमध्ये सुद्धा टेस्ट मॅच हरली. त्यांच्या कार्यकाळात मागच्या तीनपैकी दोन सीरीजमध्ये मायदेशातच क्लीन स्वीपचा सामना करावा लागलाय.
टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड चांगला
टेस्ट सीरीज संपल्यानंतर आता वनडे सीरीजवर लक्ष आहे. ही सीरीज जिंकण्यासाठी टीम इंडियाला आपल्या क्षमतेनुसार खेळ दाखवावा लागेल. कारण दक्षिण आफ्रिकेची टीम फॉर्ममध्ये आहे. ही सीरीजही ते जिंकले, तर गौतम गंभीर यांच्यावरील दबाव आणखी वाढेल. टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड चांगला आहे. या टीममध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली सुद्धा आहेत.
Crowd is cooking Gambhir.💀 pic.twitter.com/llcpCZLoAQ
— Gems of Cricket (@GemsOfCrickets) November 28, 2025
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी भारताची वनडे टीम
केएल राहुल (कॅप्टन), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत, वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड़, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी आणि अर्शदीप सिंह.