
भारतीय क्रिकेटर संघाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्या हा मागील काही दिवसांपासून त्याच्या खेळापेक्षा अधिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. नताशा हिच्या घटस्फोटानंतर हार्दिक पंड्या मॉडेल माहिका शर्मा हिला डेट करतोय. दोघे अनेकदा स्पॉट होताना देखील दिसले. हेच नाही तर माहिकासोबत त्याने खास पद्धतीने बर्थडे साजरा केला. हार्दिक आणि माहिका या दोघांनी साखरपुडा केल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. नुकताच हार्दिकने आपल्या लेकासोबतच माहिका शर्मासोबतचे अत्यंत खास फोटो शेअर करताना दिसला. हेच नाही तर एका फोटोमध्ये त्याने माहिका उचलून कडेवर घेतल्याचेही बघायला मिळतंय. सध्या चर्चा फक्त आणि फक्त माहिका आणि हार्दिक पंड्या यांच्याबद्दल रंगताना दिसतंय. अत्यंत खास लोकांच्या उपस्थितीमध्ये हार्दिकने माहिकासोबत लग्न केल्याचेही सांगितले जाते.
हेच नाही तर माहिका शर्मा प्रेग्नंट असल्याचाही मोठा दावा केला जात आहे. नताशा आणि हार्दिक पंड्या एकमेकांना डेट करत असतानाच नताशा प्रेग्नंट झाली, त्यानंतर हार्दिकने अगदी साध्या पद्धतीने नताशासोबत लग्न केले. हार्दिकच्या कुटुंबियांना देखील त्याच्या लग्नाची कल्पना नव्हती. अगोदर त्याने तिला प्रपोज केला आणि थेट लग्न केले. लग्नाच्या काही दिवसानंतर नताशाने अगस्त्यला जन्म दिला. त्यानंतर लग्नाच्या काही वर्षानंतर थाटात लग्न राजस्थानला नताशा आणि हार्दिकने केले.
राजस्थानमध्ये केलेल्या शाही लग्नानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांचा घटस्फोट झाला. आता मॉडेल माहिका शर्मा देखील प्रेग्नंट असल्याचे सांगितले जाते. ती लवकरच हार्दिक पंड्याच्या बाळाला जन्म देईल. आता सततच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर हार्दिक पंड्या याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिने मोठे विधान करत खुलासा केला आहे. यावर हार्दिक पंड्याने बोलणे टाळले असले तरीही माहिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
माहिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मी इंटरनेटवर पाहत आहे की, माझा साखरपुडा झाला आहे, पण मी तुम्हाला सांगते की, मी दररोज चांगले दागिने घालते… पोस्टमध्ये तिने एका मुलीला गुलाबी बाळाच्या गाडीत बसलेले दाखवले आणि लिहिले, प्रेग्नंसीच्या अफवांशी लढण्यासाठी मी या गाडीत बसू शकते का?” महिका शर्माच्या दोन्ही पोस्ट व्हायरल होत आहेत आणि लोक त्यावर कमेंट करत आहेत.