प्रसिद्ध क्रिकेटपटूने गूपचूप उरकले लग्न, अभिनेत्रीसोबतच्या फोटोंनी वेधले लक्ष

आयपीएलमध्ये शाहरुख खान यांच्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघातील खेळाडूने एका लोकप्रिय अभिनेत्रीशी लग्न केले आहे. दोघांचे लग्नातील फोटो पाहून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

प्रसिद्ध क्रिकेटपटूने गूपचूप उरकले लग्न, अभिनेत्रीसोबतच्या फोटोंनी वेधले लक्ष
प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या लग्नातील फोटो
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 08, 2026 | 12:26 PM

क्रिकेट आणि बॉलिवूड दोन्हीचे एकदम जवळचे नाते असल्याचे बोलले जाते. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केली आहे. या यादीमध्ये विराट कोहली-अनुष्का शर्मा, सागरिका घाटके- जहीर खान अशा काही जोड्यांचा समावेश आहे. आता या यादीमध्ये आणखी एका क्रिकेटपटू समाविष्ट झाला आहे. त्याने नुकताच एका अभिनेत्रीशी लग्न केले आहे. त्याच्या लग्नातील फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

आम्ही भारतीय क्रिकेटर रमनदीप सिंह विषयी बोलत आहेत. त्याने कैसी है यारियां मालिकेतील अभिनेत्री चार्ली चौहानशी लग्न केले आहे. दोघांचा लग्नसोहळा अतिशय गुपचुप पद्धतीने पार पडला आहे. या लग्नाला केवळ कुटुंबिय आणि जवळच्या काही मोजक्याच लोकांना बोलावण्यात आले होते. पंजाब किंग्सच्या सोशल मीडिया हँडलवर रमनदीप सिंह आणि चार्ली यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर कपलचे वेडिंग फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

रमनदीप-चार्ली झाले पती-पत्नी

क्रिकेटर रमनदीप सिंह २९ वर्षांचा आहे. त्याने अभिनेत्री चार्ली चौहानशी अतिशय खासगी पद्धतीने लग्न केले. दोघांनी गुरुद्वारामध्ये पारंपरिक शीख पद्धतीने विवाह केला आहे. लग्नात फक्त दोघांचे जवळचे नातेवाईक, मित्र आणि कुटुंबीयच उपस्थित होते. रमनदीप आणि चार्लीच्या लग्नात क्रिकेटर अर्शदीप सिंहही वराती म्हणून आला होता. दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांना आश्चर्य वाटले, कारण आतापर्यंत त्यांनी आपले नाते गुप्त ठेवले होते.

दोघांचा लग्नातील लूक!

अभिनेत्री चार्ली चौहान लाल रंगाचा लेहंगा घातला होता. लेहंग्यावर अभिनेत्रीने सोन्याचा मांगटीका, झुमके आणि नथ घालून आपला ब्राइडल लुक केला. तिने त्यावर मॅचिंग नेकलेसही परिधान केला. हातात अभिनेत्रीने लाल रंगाचा चूडा घातला आहे. दुसरीकडे क्रिकेटर रमनदीप सिंह आयव्हरी रंगाच्या शेरवानीत दिसला. दोघेही अतिशय सुंदर लूकमध्ये दिसत आहेत. चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना लग्नाच्या भरपूर शुभेच्छा देत आहेत.

कोण आहे चार्ली चौहान?

चार्ली चौहानबद्दल बोलायचे तर ती पहिल्यांदा एमटीव्ही रोडीज ७ मध्ये दिसली होती. शोमुळे तिला चांगली ओळख मिळाली. त्यानंतर ती ‘कैसी ये यारियां’ शोमध्ये दिसली. त्या बॉयफ्रेंड कुंवर अमर यांच्यासोबत नच बलियेमध्येही सहभाग घेतला होता. मात्र, नंतर त्यांचा ब्रेकअप झाला होता. दुसरीकडे रमनदीप सिंह डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये पंजाबसाठी खेळतो. मात्र आयपीएलमध्ये तो शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा भाग आहे. सध्या तो खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us