हे चुकीचे राव… रोहित शर्मा याचा संताप, थेट लहान मुलीचा हात पकडत क्रिकेटरने…

भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा आणि त्याचा दमदार खेळ चर्चेत असतो. रोहित शर्मा काही दिवसांपासून कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतोय. रोहित नुकताच विमानतळावर स्पॉट झाला. ज्याचा व्हिडीओ पुढे आला असून लोक रोहितचे काैतुक करताना दिसत आहेत.

हे चुकीचे राव... रोहित शर्मा याचा संताप, थेट लहान मुलीचा हात पकडत क्रिकेटरने...
Rohit Sharma
| Updated on: Jan 08, 2026 | 6:07 PM

भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे. मागील काही दिवसांपासून पत्नी रितीका सचदेह हिच्यासोबत सतत मुंबईत स्पॉट होताना रोहित शर्मा दिसला. यादरम्यान त्याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले. रोहित मुंबईतील प्रभादेवी भागात आपल्या कुटुंबासोबत आलिशान सोसायटीमध्ये राहतो. रोहितने क्रिकेटमध्ये धमाल केली असून अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. रोहितचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. भारतीय क्रिकेट संघ 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरोधात क्रिकेट मालिका खेळणार आहे. रोहित शर्मासोबतच अनेक दिग्गज खेळाडू यादरम्यान मैदानात उतरतील. या मालिकेचा सर्वात पहिला सामना हा वडोदरा येथे खेळला जाईल. नुकताच रोहित शर्मा हा मुंबई विमानतळावर स्पॉट झाला.

रोहित शर्माला विमानतळावर बघताच चाहत्यांनी मोठी गर्दी केली. सगळ्यांचा रोहित शर्मासोबत फोटो हवी होती. वडोदराला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर एक वेगळा स्वभाव रोहित शर्माचा बघायला मिळाला. यावेळी चिमुकल्या मुलीच्या पालकांवर रोहित चांगलाच भडकला. विमानतळावर जात असताना रोहित शर्मा भोवती चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली. यादरम्यान रोहित शर्मासोबत फोटो काढण्यासाठी एक व्यक्ती गर्दीत आपल्या चिमुकल्या लेकीला घेऊन आला.

गर्दी इतकी वाढली की, त्या लेकराला धक्के लागत असल्याचे लक्षात येताच रोहित शर्मा संतापला. त्याचा चेहरा यादरम्यान बरेच काही सांगून जाताना दिसला. तुम्ही लोक खरोखरच खूपच जास्त चुकीचे वागता म्हणत रोहितने त्या मुलीच्या वडिलांना सुनावले. इतक्या गर्दीत लेकराला असे घेऊन आल्याचे रोहितला अजिबातच आवडले नाही. रोहितने त्या मुलीला हाताला पकडत आपल्या जवळ घेतले.

त्यानंतर त्या छोट्या मुलीसोबत काही सेकंद रोहित तिथे थांबवा. ज्यावेळी तिच्या पालकांकडे प्रेमाने दिले त्यावेळीच रोहित शर्मा तिथून पुढे निघून गेला. रोहितचे हे वागणे पाहून लोक त्याचे काैतुक करताना दिसत आहेत. कारण त्या लेकराच्या प्रेमापोटी रोहित तिथे थांबवा. आता रोहित शर्मा याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. रोहित शर्मा याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. रोहितच्या मुलीचे नाव समायरा आहे.