युजवेंद्र चहल थेट या अभिनेत्रीच्या प्रेमात? मुंबईत दोघे स्पॉट, थेट आरजे महवशनंतर क्रिकेटर..
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. लग्नाला चार वर्ष पुर्ण होताच युजवेंद्रने धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट घेतला. आता त्याचे नाव थेट एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे.

भारतीय क्रिकेट युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून युजवेंद्र चहल भारतीय क्रिकेट संघाकडून खेळत आहे. शिवाय आयपीएलमध्येही युजवेंद्र चहलची धमाकेदार कामगिरी राहिली. 2025 मध्ये युजवेंद्र चहल याने पत्नी धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट घेतला. मात्र, घटस्फोटाचे नेमके कारण दोघांनीही सांगितले नाही. घटस्फोटादरम्यान युजवेंद्र चहल याच्याकडून मोठी पोटगी धनश्रीने घेतल्याची चर्चा होती. घटस्फोट घेण्यापूर्वी दोघेही 18 महिन्यांपासून विभक्त राहत होते. मुंबईमध्ये राहण्यावरून दोघांमध्ये वाद असल्याचे सांगितले गेले. धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर युजवेंद्र चहल हा आरजे महवशसोबत स्पॉट होताना दिसला. हेच नाही तर दोघे विदेशातही फिरताना दिसले. आरजे महवश हिच्यामुळेच धनश्री आणि युजवेंद्र चहल यांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले जाते. आरजे महवश आणि युजवेंद्र चहल लग्न करणार असल्याचेही सांगितले जाते होते.
यादरम्यानच आरजे महवश हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही आरोप केली. युजवेंद्रने सर्वच गोष्टींना उत्तर न देण्याबाबत पोस्ट शेअर केली. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो देखील केले. ज्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा रंगताना दिसल्या. एक्स पत्नी धनश्री वर्मा हिच्यासोबतही युजवेंद्र विमानतळावर स्पॉट झाला. ज्यामुळेच दोघांमध्ये वाद झाल्याचा दावा केला जात आहे.
आरजे महवश हिच्यासोबत ब्रेकअपची चर्चा असतानाच आता युजवेंद्र चहल चक्क एका अभिनेत्रीसोबत स्पॉट झाला. बिग बॉस फेम आणि अभिनेत्री शेफाली बग्गा हिच्यासोबत स्पॉट झाला. ज्यामुळे विविध चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे. युजवेंद्र चहल हा शेफाली बग्गा हिला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. चहल आणि शेफाली एका रेस्टारेंटबाहेर स्पॉट झाले. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
युजवेंद्र चहल याने आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरूवात केल्याचेही बोलले जात आहे. आरजे महवश आणि युजवेंद्र चहल यांचे ब्रेकअप झाल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे. युजवेंद्र चहल आणि शेफाली बग्गा यांना पापाराझींनी बघताच शेफाली बग्गा दूर जाऊन उभी राहिली. तिने पापाराझींना फोटोसाठी पोझही दिली नाही. शेफाली पापाराझींना न बोलताच निघून गेली.
