IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीचे भावूक ट्विट, म्हणाला…..

| Updated on: Nov 07, 2020 | 5:00 PM

एलिमिनेटर सामन्यात पराभूत झाल्यानंतर विराटने हे भावूक ट्विट केलं.

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीचे भावूक ट्विट, म्हणाला.....
Follow us on

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) एलिमिनेटर सामन्यात (Eliminator 2020) सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Bangalore) 6 विकेट्सने मात केली. हैदराबादने या विजयासह क्वालिफायर 2 सामन्यात धडक मारली. तर बंगळुरुचे आव्हान संपुष्टात आले. हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने एक भावूट ट्विट केलं आहे. ipl 2020 srh vs rcb eliminator after the defeat against hyderabad bangalore captain virat kohli emotional tweet

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

विराटने बंगळुरु टीमचा सपोर्ट स्टाफसोबतचा फोटोसह ट्विट केलंय. या ट्विटमध्ये म्हटलंय “दु:ख आणि आनंदीही आहोत. एक टीम म्हणून आमचा या मोसमात चांगला प्रवास राहिला. या मोसमात आमच्या बाजूने काहीच गेलं नाही. मात्र तरीही मला आमच्या संघाचा अभिमान आहे, असं विराटने ट्विटमध्ये म्हटलंय. तसेच विराटने चाहत्यांचेही आभार मानले आहेत. “तुमच्या समर्थन आणि प्रेमासाठी मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. तुमच्या सर्वांचे प्रेम आम्हाला सामर्थ्य देतं. आपण लवकरच भेटू असं”, असंही विराटने ट्विटमध्ये म्हटलंय.

सामन्याचा लेखाजोखा

हैदराबादने टॉस जिंकून बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडले. बंगळुरुने एबी डी व्हीलियर्सच्या (A B DE Villiers) अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 131 धावा केल्या. हैदराबादला विजयासाठी 132 धावांचे आव्हान मिळाले. बॅटिंगसाठी आलेल्या हैदराबादने ठराविक अंतराने 4 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर केन विल्यमसन (Kane Williamson) आणि जेसन होल्डर (Jason Holder) या दोघांनी 65 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर हैदराबादने बंगळुरुवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

पराभवाचं खापर देवदत्तवर

विराटने बंगळुरुच्या पराभवाचं खापर देवदत्त पडीक्कलवर (Devdutt Padikkal) फोडलं आहे. पडीक्कलने केन विल्यमसनचा कॅच पकडला असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असे कोहली म्हणाला. शेवटच्या काही ओव्हरमध्ये सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. जेसन होल्डर आणि केन विल्यम्सन ही सेट जोडी मैदानात होती. नवदीप सैनी 18 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमध्ये केनने सीमारेषेवर देवदत्तच्या दिशेन फटका मारला. देवदत्तने हा कॅच पॅकडला. मात्र देवदत्तचं संतुलन बिघडलं. त्यामुळे त्याने चेंडू आतमध्ये फेकला. मात्र पुन्हा त्याला कॅच घेता आला नाही. कदाचित हा कॅच देवदत्तने घेतला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असं म्हणत विराटने देवदत्तवर पराभवाचं खापर फोडलं.

क्वालिफायर – 2

हैदराबादने बंगळुरुवर विजय मिळवत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली आहे. हैदराबादची या क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) गाठ पडणार आहे. हा सामना 8 नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सविरुदध (Mumbai Indians) भिडणार आहे. अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : हैदराबादची बंगळुरुवर 6 विकेट्सने मात, क्वालिफाय 2 सामन्यात दिल्लीविरुद्ध भिडणार

IPL 2020 SRH vs RCB Eliminator : विराट कोहलीने ‘या’ खेळाडूवर फोडले RCBच्या पराभवाचे खापर

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : 10 व्या सामन्यानंतर आम्ही भरकटलो, बंगळुरुचा हेड कोच सायमन कॅटिचची कबुली

ipl 2020 srh vs rcb eliminator after the defeat against hyderabad bangalore captain virat kohli emotional tweet