AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : 10 व्या सामन्यानंतर आम्ही भरकटलो, बंगळुरुचा हेड कोच सायमन कॅटिचची कबुली

एलिमिनेटर सामन्यात हैदराबादने पराभूत केल्यानं बंगळुरुचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : 10 व्या सामन्यानंतर आम्ही भरकटलो, बंगळुरुचा हेड कोच सायमन कॅटिचची कबुली
| Updated on: Nov 07, 2020 | 3:58 PM
Share

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील एलिमिनेटर (Eliminator 2020) सामना 6 नोव्हेंबरला खेळण्यात आला. हा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Heyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challenegere Banglore) यांच्यात खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर 6 विकेट्सने मात केली. या विजयासह हैदराबादने क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. तर बंगळुरुचे आव्हान संपुष्टात आलं. आम्ही साखळी फेरीतील 10 व्या सामन्यानंतर लय गमावली, अशी कबुली बंगळुरुचा मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिचने (Rcb Head Coach Simon Catich) दिली आहे. ipl 2020 srh vs rcb eliminator we lost track after 10th match said royal challengers bangalore head coach simon katich

कॅटिच काय म्हणाला?

“आम्ही साखळी फेरीतील 10 सामन्यात चांगल्या पद्धतीने खेळ करत होतो. आमच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. आम्ही बॅटिंगमध्ये कमी पडलो. आयपीएलच्या 13 व्या मोसमात आमची चांगली सुरुवात राहिली. मात्र त्यानंतरही आम्ही बॅटिंगमध्ये कमी पडलो”, असं कॅटिच एलिमिनेटर सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

हैदराबादच्या गोलंदाजांच कौतुक

कॅटिचने हैदराबादच्या गोलंदाजांत कौतुक केलं. “हैदराबादचे गोलंदाज बंगळुरुला 131 धावांवर रोखण्यास यशस्वी ठरले. आम्ही 150 धावा केल्या असत्या तर, फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि अॅडम झॅम्पाच्या (Adam Zampa) मदतीने हैदराबादला झुंज देणं शक्य झालं असतं”, असही कॅटिचने नमूद केलं. तसेच कॅटिचने बंगळुरने केलेल्या धावसंख्येवरुन निराशा व्यक्त केली. “खेळपट्टी फार संथ होती. तसेच चेंडू ही टर्न होत होता. आम्हाला केवळ 131 धावाच करता आल्या. हे फार निराशाजनक होतं”, या शब्दात कॅटिचने नाराजी व्यक्त केली.

संघातील बदलांचा परिणाम?

एलिमिनेटर सामन्यासाठी बंगळुरुत काही बदल करण्यात आले. या सामन्यात बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सलामीला आला. या बदलांमुळे सामन्याच्या निकालावर परिणाम झाला का, असा प्रश्न कॅटिचला विचारण्यात आला. यावर कॅटिच म्हणाला “आम्ही फार बदल केले नाहीत. जोश फिलिपला (Josh Philippe) संधी देण्यात आली. तसेच विराट सलामीला खेळेल, असं प्ले ऑफआधीच ठरलं होतं. मात्र विराटला बंगळुरुसाठी चांगली सुरुवात देता आली नाही. विराट स्वस्तात बाद झाला. आम्ही संघात फार बदल केले नाहीत. जे बदल केले, ते नाईलाजाने करावे लागले”, असं उत्तर कॅटिचने दिलं.

देवदत्त पडीक्कलचं कौतुक

देवदत्त पडीक्कलने (Devdutt Padikkal) या मोसमात चांगली कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीचं कॅटिचने पत्रकार परिषेदत कौतुक केलं. देवदत्तचा हा आयपीएलचा पहिलाच मोसम होता. देवदत्तने या मोसमात एकूण 15 सामन्यात 124.80 च्या स्ट्राईक रेटने 31.53 च्या सरासरीने 473 धावा केल्या. देवदत्तने यामध्ये 5 अर्धशतकं लगावली. देवदत्त पदार्पणातील मोसमात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. अनकॅप्ड म्हणजे देशांतर्गंत स्पर्धेत खेळणारा खेळाडू तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व न केलेला खेळाडू.

संबंधित बातम्या :

IPL 2020, DCvs RCB : देवदत्त पडीक्कलची विक्रमी कामगिरी

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : हैदराबादची बंगळुरुवर 6 विकेट्सने मात, क्वालिफाय 2 सामन्यात दिल्लीविरुद्ध भिडणार

IPL 2020 SRH vs RCB Eliminator: विराट कोहलीने ‘या’ खेळाडूवर फोडले RCBच्या पराभवाचे खापर

ipl 2020 srh vs rcb eliminator we lost track after 10th match said royal challengers bangalore head coach simon katich

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.