AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 SRH vs RCB Eliminator: विराट कोहलीने ‘या’ खेळाडूवर फोडले RCBच्या पराभवाचे खापर

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात हैदराबादने बंगळुरुचा सहा गडी राखून पराभव केला. | SRH vs RCB Eliminator

IPL 2020 SRH vs RCB Eliminator: विराट कोहलीने 'या' खेळाडूवर फोडले RCBच्या पराभवाचे खापर
| Updated on: Nov 07, 2020 | 8:27 AM
Share

अबुधाबी: आयपीएलमधील एलिमिनेटर सामन्यात (Eliminator 2020) हैदराबाद सनराजर्स संघाकडून (Sunrisers Hyderabad) पराभूत झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली चांगलाच वैतागलेला दिसला. फलंदाजांचे अपयश आणि निर्णायक क्षणी गचाळ क्षेत्ररक्षण झाल्यामुळे बंगळुरुला हा सामना गमवावा लागला. या पराभवासाठी विराट कोहलीने देवदत्त पडिक्कल याला जबाबदार धरले. पडिक्कलने केन विल्यमसनचा झेल पकडला असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असे कोहलीने म्हटले. (2020 Eliminator sunrisers hyderabad vs royal challengers bangalore)

बंगळुरुने अवघ्या 132 धावांचे लक्ष्य उभारुनही हैदराबादला विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला. 18 व्या षटकात नवदीप सैनी याचा फुलटॉस चेंडू केन विल्यम्सनने फ्लिक केला. तेव्हा सीमारेषेवर उभ्या असलेल्या देवदत्त पडीक्कलने झेल पकडला पण त्याला संतुलन राखता आले नाही. त्यामुळे सीमारेषेपलीकडे जाण्यापूर्वी देवदत्त पडीक्कलने चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला. यामुळे हा झेल सुटला. यामुळे त्याने पाच धावा वाचवल्या असल्या तरी केन विल्यम्सनला जीवदान मिळाले. या जीवदानाचा फायदा उठवत केन विल्यम्सनने हैदराबादला विजय मिळवून दिला.

या सामन्यानंतर विराट कोहलीने बंगळुरुच्या फलंदाजीविषयीही नाराजी व्यक्त केली. गेल्या काही सामन्यांपासून बंगळुरुचे फलंदाज सातत्याने अपयशी ठरत होते. कालच्या सामन्यात विराट कोहलीने सलामीला येऊन प्रयोग करुन बघितला. मात्र, त्याला अवघ्या पाच धावांवर माघारी परतावे लागले. आम्ही चांगली धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलो. दुसऱ्या सत्रात आमची स्थिती चांगली होती. मात्र, आम्हाला त्याचे रुपांतर मोठ्या धावसंख्येत करता आले नाही, अशी खंत विराट कोहलीने बोलून दाखवली.

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात हैदराबादने बंगळुरुचा सहा गडी राखून पराभव केला. बंगळुरुने हैदराबादला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादने हे विजयी आव्हान 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून पूर्ण केले. केन विल्यमसन आणि जेसन होल्डर हे दोघे हैदराबादच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 65 धावांची विजयी भागीदारी केली. केन विल्यमसनने नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर जेसन होल्डरने 24 धावांची महत्वाची खेळी केली. त्यामुळे आता 8 नोव्हेंबरला होणाऱ्या क्वालिफायर 2 सामन्यात हैदराबाद आणि दिल्ली एकमेकांना भिडतील.

संबंधित बातम्या:

केन विल्यमसनची नाबाद अर्धशतकी खेळी, हैदराबादची बंगळुरुवर 6 विकेट्सने मात, क्वालिफाय 2 सामन्यात दिल्लीविरुद्ध भिडणार

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावे अनोखा विक्रम, धोनी-रोहितच्या पंगतीत स्थान

(2020 Eliminator sunrisers hyderabad vs royal challengers bangalore)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.