AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : टॉस जिंकताच हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावे अनोखा विक्रम, धोनी-रोहितच्या पंगतीत स्थान

या सामन्यातील विजेता संघांचा सामना क्वालिफायर-2 मध्ये दिल्लीविरुद्ध होणार.

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : टॉस जिंकताच हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावे अनोखा विक्रम, धोनी-रोहितच्या पंगतीत स्थान
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 06, 2020 | 8:57 PM
Share

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील एलिमिनेटर सामना (Eliminator 2020) सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादने टॉस जिंकून बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडले. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner)  नावे टॉस जिंकताच अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. असा अनोखा विक्रम आपल्या नावावर करणारा वॉर्नर तिसरा कर्णधार ठरला आहे. ipl 2020 eliminator srh vs rcb after winning the toss hyderabad skipper david warner record joins dhoni and rohit club

काय आहे विक्रम?

डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या 13 व्या मोसमात 11 वेळा टॉस जिंकणारा कर्णधार ठरला आहे. यासह वॉर्नरचा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) मानाच्या यादीत समावेश झाला आहे. याआधी आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जसचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने प्रत्येकी 11 वेळा टॉस जिंकण्याची कामगिरी केली आहे. रोहित शर्माने 2017 मध्ये 11 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा टॉस जिंकला आहे. तर महेंद्रसिंह धोनीने 2018 मध्ये सर्वाधिक वेळा टॉस जिंकण्याचा मान पटकावला होता.

दोघांसाठी ‘करो या मरो’

हैदराबाद आणि बंगळुरु या दोघांसाठी एलिमिनेटर सामना ‘करो या मरो’चा आहे. या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाचा सामना क्वालिफायर-2 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे. तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Jasprit Bumrah | बुम बुम बुमराह ! जसप्रीतची विक्रमी कामगिरी, जबरदस्त कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज

IPL 2020 | आंतरराष्ट्रीय मैदानात उगवण्याआधीच सूर्यकुमारला नकोशा विक्रमाचे ग्रहण

Photo | हैदराबाद वरचढ ठरणार की बंगळुरु विजयश्री पटकावणार? दिल्लीशी कोणाची गाठ पडणार?

ipl 2020 eliminator srh vs rcb after winning the toss hyderabad skipper david warner record joins dhoni and rohit club

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...