IPL 2020 : ‘आमच्या खेळाडूंचं वय झालंय’, चेन्नई सुपरकिंग्सचे कोच फ्लेमिंग यांची नाराजी

| Updated on: Oct 20, 2020 | 6:42 PM

आईपीएल 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे.

IPL 2020 : आमच्या खेळाडूंचं वय झालंय, चेन्नई सुपरकिंग्सचे कोच फ्लेमिंग यांची नाराजी
Follow us on

दुबई : आईपीएल (IPL 2020) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. टीम सध्या स्पर्धेतून बाहेर होण्याचा मार्गावर आहे. चेन्नईने आतापर्यंत 10 पैकी 7 सामने गमावले आहेत.

संघाचे कोच (प्रशिक्षक) स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी आमचा संघ वयस्कर असल्याचे म्हटले आहे. फ्लेमिंग म्हणाले की, आमच्या संघातील अनेक खेळाडू वयस्कर असल्याने स्पर्धेदरम्यान अनेक अडचणी येतील ही गोष्ट संघ व्यवस्थापनाला आधीच माहीत होती. (IPL 2020 : Stephen Fleming says Chennai Super Kings may have run out of juice)

राजस्थान रॉयल्सविरुद्ध काल (19 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. “हा पराभव फ्लेमिंग यांच्या जिव्हारी लागला आहे. या सामन्यानंतर बोलताना फ्लेमिंग म्हणाले की, जर आपण गुणतालिकेकडे पाहीलं तर लक्षात येईल की, या संघाची ताकद आता संपली आहे”.

“संघाची मागील तीन वर्षांमधील कामगिरी पाहा. पहिल्या वर्षी या संघाने विजेतेपद मिळवलं. दुसऱ्या वर्षी हा संघ शेवटच्या चेंडूवर पराभूत झाला. आमच्या संघव्यवस्थापनाला वाटत होतं की, या संघातील अनेक खेळाडूंचं वय वाढलं आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे”.

फ्लेमिंग म्हणाले की, “मी प्रमाणिकपणे सांगेन की, सध्या आमच्या ड्रेसिंग रुममधलं वातावरण खूपच शांत आहे. दोन सामन्यांमध्ये आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे अनेक खेळाडू खचले आहेत. आमच्या संघाला पूर्ण कल्पना होती की, या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर राजस्थानविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे खूप आवश्यक आहे”.

फ्लेमिंग म्हणाले की, “मला असं वाटतंय की, अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याचे आमचे रस्ते अद्याप बंद झालेले नाहीत. परंतु जेव्हा तुम्ही इतर संघांच्या सामन्यांमधील निकालांवर अवलंबून असता आणि त्याचवेळी तुमच्या संघाची कामगिरी फार बरी झालेली नसते अशा वेळी तुमच्या खेळाडूंचा फॉर्म आणि त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो”.

धोनी म्हणतो तरुणांना संधी देणार

सामना संपल्यानंतर कर्णधार धोनी म्हणाला की, “आगामी सामन्यांमध्ये तरुण खेळाडूंना अधिक संधी दिली जाईल. यावेळी आम्ही तरुण खेळाडूंना कमी संधी दिली. पुढील सामन्यांमध्ये ते कोणत्याही दबावाविना खेळतील”.

संबंधित बातम्या

IPL 2020 | MIvKXIP : सचिन तेंडुलकरमुळे मुंबई सुपर ओव्हरमध्ये हरली?

Super Over | मुंबई-पंजाबची सुपर ओव्हरही टाय, सुपर ओव्हरबद्दल रंजक गोष्टी, 47 वेळा पाठलाग करणाऱ्यांचा विजय

IPL 2020, MI vs KXIP, Super Over : ‘डबल धमाल’, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय

IPL 2020, SRH vs KKR : डेव्हिड वॉर्नरच्या आयपीएलमध्ये वेगवान 5 हजार धावा, विराट कोहलीला पछाडलं

IPL 2020 | ‘दुखापतग्रस्त’ दिल्लीला दिलासा, अमित मिश्राच्या जागी नव्या फिरकीपटूला संधी

(IPL 2020 : Stephen Fleming says Chennai Super Kings may have run out of juice)