Chinese rocket | चीनचे रॉकेट कोसळताना जोरदार धमाका, वॉर्नरने मालदीवमधून सांगितला थरारक अनुभव

| Updated on: May 11, 2021 | 2:52 PM

चीनचे अनियंत्रित रॉकेट मालदीवजवळ समुद्रात कोसळले. त्यावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ किनाऱ्यापासून काही अंतरावर होता (David Warner Chinese rocket Maldives)

Chinese rocket | चीनचे रॉकेट कोसळताना जोरदार धमाका, वॉर्नरने मालदीवमधून सांगितला थरारक अनुभव
David Warner
Follow us on

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायदेशी परतण्याआधी मालदीवला (Maldives) थांबले आहेत. याचवेळी चीनचे अनियंत्रित रॉकेट (Chinese rocket) मालदीवजवळ समुद्रात कोसळले. हे रॉकेट कोसळताना पाहून ऑस्ट्रेलियन संघ भयभीत झाला होता. (IPL 2021 Australian Cricketer David Warner tells terrifying experience of Chinese rocket falling near Maldives Sea)

ऑस्ट्रेलियन संघाने धमाका ऐकला

चीनचे अनियंत्रित रॉकेट काही दिवसांपूर्वीच मालदीवजवळ समुद्रात कोसळले. त्यावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आणि स्टाफ किनाऱ्यापासून काही अंतरावर होता. क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) याच्यासह अनेकांनी रॉकेट पडतानाचा आवाज ऐकला होता. देशात कुठेतरी भयंकर स्फोट झाला, असं त्यांना वाटलं होतं.

सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास रॉकेट मालदीवजवळ कोसळलं, तेव्हा माझा डोळा उघडला, असं डेव्हिड वॉर्नरने द ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. आम्ही तो धमाका ऐकला. एक्स्पर्टच्या मते तो रॉकेट पडण्याचा आवाज नव्हता, तर वातावरणात रॉकेटमुळे जे घर्षण निर्माण झालं, त्याचा होता, असं वॉर्नर सांगतो.

रॉकेट कोसळतानाचा व्हायरल व्हिडीओ 

दरम्यान, चीनचे अनियंत्रित रॉकेट कोसळतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. मात्र हा व्हिडीओ खरा आहे की खोटा याची पुष्टी कोणी केलेली नाही.

रॉकेटचे नेमके काय झाले?

29 एप्रिल रोजी चीनकडून हे रॉकेट अंतराळात सोडण्यात आले होते. हे रॉकेट अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या रॉकेटने पृथ्वीच्या दिशेने उलटा आणि अनियंत्रित प्रवास सुरु केला होता. हे रॉकेट पृथ्वीवर कोसळल्यास मोठे नुकसान होईल, अशी शक्यता चिनी माध्यमांनी वर्तविली होती. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हे रॉकेट नष्ट करण्यात आले. त्यानंतर रॉकेटचे तुकडे मालदीव्जजवळ अरबी समुद्रात जाऊन कोसळले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी: चीनचं ‘ते’ अनियंत्रित रॉकेट अखेर समुद्रात कोसळलं

(IPL 2021 Australian Cricketer David Warner tells terrifying experience of Chinese rocket falling near Maldives Sea)