IPL 2023 : टी20 विश्वचषक स्पर्धेतल्या पराभवानंतर या खेळाडूने घेतला मोठा निर्णय, IPL मध्ये खेळणार नसल्याचं केलं जाहीर

विश्वचषकातील लाजीरवाणा पराभव जिव्हारी लागल्याने खेळाडूने घेतला मोठा निर्णय

IPL 2023 : टी20 विश्वचषक स्पर्धेतल्या पराभवानंतर या खेळाडूने घेतला मोठा निर्णय, IPL मध्ये खेळणार नसल्याचं केलं जाहीर
IPL 2023
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Nov 15, 2022 | 10:26 AM

मुंबई : भारतात आयपीएलची (IPL 2023) तयारी आतापासून सुरु झाली आहे. आज कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये असणार याची माहिती सायंकाळी पाचवाजेपर्यंत आयपीएलकडून जाहीर करण्यात येणार आहे. कारण टीम (Team) मालकांना आज मोठा निर्णय घ्यायचा आहे, कोणत्या खेळाडूला टीममध्ये ठेवून घ्यायचे आणि कोणत्या खेळाडूला बाहेर काढायचे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडूंना (Player) संधी मिळण्याची शक्यता आहे.

IPL 2023 ची तयारी आतापासून सुरु झाली आहे. पण विश्वचषक स्पर्धेत पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया टीमचा खेळाडू पैट कमिंस याने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो कोलकाता नाईट राइडर्स या टीमसाठी अनेकवर्षे क्रिकेट खेळला आहे. त्याने यंदाच्यावर्षी आयपीएल स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट राइडर्स या टीमला नव्या खेळाडूला संधी द्यावी लागणार आहे.

पैट कमिंस या खेळाडूने ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं आहे, की मला विश्रांतीची गरज आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया टीमच्या वर्षभरात अनेक मॅचेस आहेत. तसेच आतापर्यंत टीमचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांनी वेळोवेळी केली, त्यांचे देखील आभार.

इंग्लंड टीमचा विकेटकीपर सॅम बिलिंग्स या खेळाडूने सुद्धा यंदाच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचं असल्यामुळे त्या हा निर्णय घेतला आहे.