IPL 2023 Auction: या 4 खेळाडूंचा फक्त एक निर्णय ज्यामुळे IPL Auction मध्ये त्यांना विकणे होणार कठीण!
या सगळ्याची खेळाडूंना सवय असते, शेवटी हा त्यांच्या करिअरचा भाग. पण फॅन्स! सगळ्यात जास्त नाराज होतात ते फॅन्स! म्हणूनच आम्ही या लिलावापूर्वी तुम्हाला त्या खेळाडूंविषयी सांगणार आहोत

आज आयपीएल प्रेमींसाठी खूप महत्त्वाचा दिवस! आज सगळ्या आयपीएल प्रेमींच्या नजरा आहेत त्या फक्त आयपीएलच्या लिलावावर, “आपल्या आवडत्या खेळाडूचं काय होतंय, कसं होतंय, कुणाविषयी काय निर्णय घेतला जातोय” हा एकच विचार फॅन्सच्या मनात. आज आयपीएल 2023 चा लिलाव! या लिलावात एकूण 405 खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला होणारे. बरं आता लिलाव म्हटलं तर कुणावर तरी जास्त पैसे खर्च होणार तर कुणी नाराज होणार . या सगळ्याची खेळाडूंना सवय असते, शेवटी हा त्यांच्या करिअरचा भाग. पण फॅन्स! सगळ्यात जास्त नाराज होतात ते फॅन्स! म्हणूनच आम्ही या लिलावापूर्वी तुम्हाला त्या खेळाडूंविषयी सांगणार आहोत ज्यांनी याआधी असा निर्णय घेतलाय ज्यामुळे त्यांना लिलावात त्रास होऊ शकतो. आयपीएलच्या लिलावात काही खेळाडूही सामील झाले आहेत, ज्यांनी आपली बेस प्राईज थोडी जास्त ठेवली आहे, ज्यामुळे त्यांना परिणाम भोगावे लागू शकतात. ते कोण आहेत ते जाणून घेऊया…
- फिल सॉल्ट :सॉल्ट त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. इंग्लंडचा हा खेळाडू वरच्या फळीतील फलंदाज आहे. मात्र या खेळाडूने आपली बेस प्राईज 2 कोटी ठेवली आहे, जी खूप जास्त आहे. फिल सॉल्ट कधीही आयपीएलमध्ये खेळला नाही आणि त्याचा टी-20 आंतरराष्ट्रीय विक्रमही असा नाही की कुणी त्याला 2 कोटींच्या बेस प्राइसवर खरेदी करायला तयार आहे. टी-२० मध्ये सॉल्टची सरासरी केवळ 22.27 आहे, त्याचा स्ट्राइक रेट 161.18 आहे.
- ख्रिस जॉर्डन : इंग्लंडचा हा वेगवान गोलंदाज टी-20 स्पेशालिस्ट मानला जातो. जॉर्डनची गणना इंग्लंड संघातील प्रमुख खेळाडूंमध्ये केली जाते. मात्र या वेगवान गोलंदाजाचा आयपीएलमधील विक्रम अतिशय खराब आहे. जॉर्डनने 28 सामन्यांत 27 बळी घेतले आहेत, पण त्याचा इकॉनॉमी रेट प्रती षटक 9.32 धावा आहे. असे असूनही जॉर्डनने आपली बेस प्राईज 2 कोटी ठेवली आहे. आता संघ त्यांच्यावर पैज लावतात की नाही हे पाहावं लागेल.
- अँजेलो मॅथ्यूज : श्रीलंकेचा माजी कर्णधार पाच वर्षांपूर्वी आयपीएलचा शेवटचा सामना खेळला होता, पण असे असूनही त्याने आपली बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली आहे. मॅथ्यूजचा आयपीएल विक्रमही काही खास नाही. त्याला 23.35 च्या सरासरीने केवळ 724 धावा करता आल्या असून त्याचा स्ट्राइक रेटही 125.91 इतका आहे. या खेळाडूच्या बेस प्राइसमुळे त्याला त्रास होऊ शकतो.
- जिमी नीशम : न्यूझीलंडचा हा अष्टपैलू खेळाडू त्याच्या खालच्या फळीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो, पण आयपीएलमध्ये त्याचा विक्रम खूपच खराब आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 160 च्या आसपास स्ट्राईक रेट असलेला हा खेळाडू आयपीएलमध्ये 100 पेक्षा कमी स्ट्राईक रेटने धावा करतो. तसेच नीशमची फलंदाजी सरासरी 10.22 इतकी आहे. असे असूनही नीशमने आपली बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली आहे.
