IPL 2024 CSK vs SRH Live Streaming : चेन्नईसमोर हैदराबादची बॅटिंग रोखण्याचं आव्हान, विजयी कोण होणार?

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Streaming : चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघांची आयपीएलच्या या 17 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे.

IPL 2024 CSK vs SRH Live Streaming : चेन्नईसमोर हैदराबादची बॅटिंग रोखण्याचं आव्हान, विजयी कोण होणार?
Image Credit source: csk vs srh ruturaj gaikwad and pat cummins ipl 2024,
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 10:30 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात 27 एप्रिलला डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स आमनेसामने असणार आहेत. ऋतुराज गायकवाड चेन्नईचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादची धुरा आहे. या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी हैदराबाद विरुद्ध चेन्नई यांच्यात 5 एप्रिल रोजी सामना झाला होता. तेव्हा हैदराबादने चेन्नईवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे चेन्नई हैदराबादला पराभूत करत पराभवाचा वचपा घेणार का? याकडे लक्ष असणार आहे.

चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघांसाठी हा सामना प्लेऑफच्या हिशोबाने महत्त्वाचा आहे. हैदराबादने 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईने 8 मधून 4 सामने जिंकलेत. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि चेन्नई सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. तसेच हैदराबादची बॅटिंग ही अनेक दिवसांपासून सर्वच संघांसाठी डोकेदुखी ठरतेय. त्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजांसमोर हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना केव्हा?

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना रविवारी 28 एप्रिल रोजी होणार आहे.

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना कुठे?

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

चेन्नई सुपर किंग्ज टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, शार्दूल ठाकुर, समीर रिझवी, रवींद्र राव , रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, रिचर्ड ग्लेसन, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, महेश तीक्षना, निशांत सिंधू आणि अरावेली अवनीश

सनरायझर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन, ट्रॅव्हिस हेड, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन आणि आकाश महाराज सिंग.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.